India Tour of South Africa 2021: भारतीय क्रिकेट संघांने नुकताच न्यूझीलंड क्रिकेट संघावर एक मोठा विजय मिळवत कसोटी मालिकाही खिशात घातली आहे. यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका सर करण्यासाठी रवाना होणार आहे. पण दक्षिण आफ्रिकेत भारताच्या दौऱ्यापूर्वी कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटच्या शिरकावामुळे या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आता वेळापत्रकात थोडा बदल करुन हा दौरा होणारच असल्याचं आयसीसीने ट्वीट करत जाहीर केलं आहे. यामध्ये दौऱ्याचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे.



भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...


कसोटी सामन्यांचे वेळापत्रक 



  • पहिला कसोटी सामना -  26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.

  • दुसरा कसोटी सामना -  3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.

  • तिसरा कसोटी सामना -  11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन  


एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक 



  • पहिला एकदिवसीय सामना - 19 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल

  • दुसरा एकदिवसीय सामना - 21 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल

  • तिसरा एकदिवसीय सामना - 23 जानेवारी, 2022, न्यू लँड्स, केपटाऊन  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha