ICC WTC Rankings : भारताने न्यूझीलंड संघाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने नमवत मालिका जिंकली आहे. या विजयानंतर आयसीसी कसीट क्रमवारीत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे. पण भारताची जिंकण्याची टक्केवारी कमी असल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मात्र भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चालू वर्षाची WTC Ranking समोर आली असून यामध्ये श्रीलंका अव्वल स्थानी असून पाकिस्तान दुसऱ्या स्थानी आहे.  


मागील वर्षीपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात WTC ला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या खेळवण्यात येणारे सर्व आंतरराष्ट्रीय कसोटी सामने हे या स्पर्धेत विजयासाठीच खेळवले जातात. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यासाठी संघाला त्यांच्या वर्षभरातील कसोटी सामने जिंकण्याची टक्केवारी सर्वाधिक ठेवावी लागते. दरम्यान मागील WTC नंतर भारताने आतापर्यंत एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये इंग्लंडविरुद्ध 4 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. ज्यातील 3 सामने जिंकत, 2 ड्रॉ आणि एक भारत पराभूत झाला आहे. त्यामुळे भारताची विजयी होण्याची टक्केवारी 58.33 टक्के आहे. तर श्रीलंका संघाने 2 पैकी 2 सामने जिंकल्यामुळे त्यांची विजयी होण्याची टक्केवारी 100 टक्के आहे. तर पाकिस्तान संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले असून एक सामना पराभूत झाल्यामुळे त्यांची विजयी होण्याची टक्केवारी 66.66 टक्के आहे. त्यामुळे हे दोघेही अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असून भारत तिसऱ्या स्थानावर आहे.



कसोटीत सर्वात मोठ्या विजयाची नोंद -
IND vs NZ 2nd Test: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) रंगलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं न्यूझीलंडला (IND Vs NZ) तब्बल 372 धावांनी पराभूत केलंय. न्यूझीलंडला 372 धावांनी पराभूत करून भारतानं सर्वात मोठ्या विजयाची नोंद केलीय. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2015 मध्ये दक्षिण अफ्रिकाविरुद्ध 337 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना दिल्लीत खेळण्यात आला होता.


भारताचा सर्वात मोठा विजय -
भारतीय क्रिकेट संघानं 2008 साली मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या संघाला 320 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर 2016 साली न्यूझीलंडविरुद्ध इंदौर येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारतानं 321 धावांनी विजय मिळवला होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha