IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला उत्तम सुरुवात करुनही सामन्यात आतापर्यंततरी खास कामगिरी करता आलेली नाही. सलामीवीरांच्या 80 धावांच्या भागिदारीनंतरही भारताचे महत्त्वाचे फलंदाज पटापट तंबूत परतले. हे महत्त्वाचे 4 विकेट घेणारा न्यूझीलंडचा एकच गोलंदाज असून विशेष म्हणजे हा गोलंदाज मूळचा मुंबईचा आहे. एजाज पटेल (Ajaz Patel) असं या खेळाडूचं नाव असून त्याचा जन्म 1988 साली मुंबईत झाला आहे.


भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. ज्यानंतर सलामीवीर शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांनी दमदार सुरुवात केली. पण संघाच्या 80 धावा झाल्या असताना शुभमन 44 धावा करुन बाद झाला. एजाज पटेलच्या चेंडूवर रॉस टेलरने त्याची झेल घेतली. त्यानंतर काही चेंडूनंतरच पुजारालाही अजाजने त्रिफळाचीत केलं. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटलाही एजाजने पायचीत करत 80 धावांवरच भारताचे तीन महत्त्वाचे गडी तंबूत धाडले. त्यानंतर काही काळ टिकल्यानंचर श्रेयसही एजाजच्या चेंडूवर टॉम ब्लंडलच्या हाती झेलबाद झाला. अशारितीने तब्बल 4 तेही महत्त्वाचे फलंदाज अजाजने बाद केले. ज्यानंतर भारतीय वंशाचा असल्याने अजाजबद्दल माहिती काढली असता त्याचा जन्म मुंबईतच झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याने त्याच्या जन्मभूमीतच ही अप्रतिम कामगिरी केली आहे.



कोण आहे अजाज पटेल?


न्यूझीलंडच्या कसोटी संघातील फिरकीपटू एजाज पटेलचा जन्म 1988 साली मुंबईत झाला होता. ज्यानंतर 1996 मध्ये एजाजचं संपूर्ण कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झालं. दरम्यान 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या एजाजने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरी आज मुंबईच्या मैदानावर भारताविरुद्ध केली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha