Ind vs Sa 4th T20 : सामना जिंकला तरी कर्णधार सूर्या घेणार धडाकेबाज निर्णय; टीम इंडियात होणार 3 बदल..., Playing XI मधून कोण OUT, कोण IN?, जाणून घ्या
India vs South Africa 4th T20 News : चौथा सामना बुधवार 17 डिसेंबर रोजी लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

India Playing-11 For 4th T20 vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या टी20 मालिकेतील चौथा सामना बुधवार 17 डिसेंबर रोजी लखनऊमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, उपकर्णधार शुभमन गिलला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याच्या जागी विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
गिलच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित...
संजू सॅमसनने मागील वर्षी भारतासाठी तीन टी20 शतके झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, ऑक्टोबर 2025 नंतर त्याला एकही टी20 सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. दुसरीकडे, शुभमन गिलचा या मालिकेतील फॉर्म अपेक्षेप्रमाणे राहिलेला नाही. पहिल्या टी20मध्ये त्याने दोन चेंडूत 4 धावा केल्या, दुसऱ्या सामन्यात मोल्लनपूर येथे तो शून्यावर बाद झाला, तर तिसऱ्या टी20मध्ये 28 चेंडूत 28 धावा केल्या, मात्र त्याचा प्रभाव फारसा जाणवला नाही. त्यामुळे गिलच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चौथ्या टी20मध्ये अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह खेळणार?
सॅमसनसोबतच चौथ्या टी20मध्ये अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाचीही शक्यता आहे. तिसऱ्या टी20मध्ये या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. त्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनी सहज पराभव केला होता. अक्षर आणि बुमराह परतल्यास नेमके कोणाला बाहेर बसवले जाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोण जाणार बाहेर?
तिसऱ्या सामन्यात अक्षर आणि बुमराहच्या जागी हर्षित राणा आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आली होती आणि दोघांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. जर संघ व्यवस्थापनाने हर्षित आणि कुलदीपला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, तर अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना लखनऊच्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे, अर्शदीप आणि वरुण यांनीही तिसऱ्या टी20मध्ये प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले होते आणि अर्शदीपला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कर्णधार सूर्यकुमार यादववर सर्वांच्या नजरा
चौथ्या टी20मध्ये भारतीय चाहत्यांच्या नजरा कर्णधार सूर्यकुमार यादववर असतील. सूर्या हा भारताचा टी20मधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असला, तरी 2025 मध्ये खेळलेल्या 20 टी20 सामन्यांच्या 18 डावांमध्ये त्याला केवळ 213 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे लखनऊमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, हर्षित राणा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
हे ही वाचा -





















