एक्स्प्लोर

IND W vs PAK : भारत पाकिस्तान आमने सामने येणार, महिला आशिया कपचा रणसंग्राम सुरु होणार, सामने कुठं पाहणार?

Women's Asia Cup 2024: हरमनप्रीत कौरच्या नेतृ्त्वात महिला आशिया कपमध्ये भारताची मोहीम पाकिस्तान विरूद्धच्या लढतीनं सुरु होत आहे. 19 जुलै रोजी भारत पाकिस्तान आमने सामने येणार आहेत.  

कोलंबो : भारतीय महिला क्रिकेट संघ ( India women's cricket team) महिला आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. महिला आशिया कप 2024  (Asia Cup 2024) उद्यापासून  सुरु होणार आहे. यापूर्वीच्या आशिया कपचं विजितेपद भारतानं मिळवलं होतं. श्रीलंकेत उद्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतानं महिला आशिया कप स्पर्धेत सातवेळा विजेतेपद मिळवलं आहे.  

भारताची मोहीम हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्त्वात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापासून सुरु होणार आहे. महिला आशिया कपमधील भारताची पहिली मॅच पारंपरिक विरोधक असलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. ही मॅच दंबुलामध्ये होणार आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी झालेले आहेत. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान,संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळचा समावेश आहे. तर, ब गटात श्रीलंका, बांग्लादेश,थायलंड आणि मलेशियाचा समावेश आहे.  

दोन्ही गटातील पहिल्या दोन क्रमांकावरील संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीच्या लढती 26 जुलै रोजी पार पडतील. तर अंतिम फेरीची लढत 28 जुलै रोजी होणार आहे. 

महिला आशिया कप स्पर्धेचं प्रक्षेपण कुठं होणार? 

महिला आशिया कप स्पर्धेचं प्रक्षेपण भारतात डिस्ने हॉटस्टारवरुन केलं जाईल. तर, टीव्हीवरील प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवर केलं जाणार आहे. 

महिला आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक Women's Asia Cup 2024: Complete Schedule

19 जुलै : 
संयुक्त अरब अमिरात विरुद्ध नेपाळ, दुपारी 2 वाजता
भारत विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी 7 वाजता 

20 जुलै

मलेशिया विरुद्ध थायलंड, दुपारी 2 वाजता
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश , सायंकाळी 7 वाजता  

21 जुलै 

भारत विरुद्ध संयुक्त अरब अमिरात ,दुपारी 2 वाजता

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ ,सायंकाळी 7 वाजता  

22 जुलै 

श्रीलंका विरुद्ध मलेशिया,दुपारी 2 वाजता 

बांग्लादेश विरुद्ध थायलंड, सायंकाळी 7 वाजता  
 
23 जुलै 

पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरात, दुपारी 2 वाजता  

भारत विरुद्ध नेपाळ, सायंकाळी 7 वाजता  

 24 जुलै 

बांग्लादेश विरुद्ध मलेशिया, दुपारी दोन वाजता 

श्रीलंका विरुद्ध थायलंड ,सायंकाळी 7 वाजता  

26 जुलै

उपांत्य फेरीचा पहिला सामना: दुपारी 2 वाजता 

उपांत्य फेरीचा दुसरा सामना : सायंकाळी 7 वाजता  

28 जुलै

अंतिम फेरीचा सामना, सायंकाळी 7 वाजता  
 
भारताचा संघ 

भारतीय संघ:हरमनप्रीत कौर(कॅप्टन), स्मृती मानधना (उपकॅप्टन), शफाली वर्मा, जेमिया रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), उमा खेत्री (विकेटकीपर),पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभमना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन 

राखीव: श्वेता शेरावत,साईका इशाक, तनुजा कन्वर, मेघना सिंग 

संबंधित बातम्या :

Team India: हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव, टी 20 मध्ये भारताचा कॅप्टन कोण होणार? आकडेवारी नेमकी कुणाच्या बाजूनं?

Rohit Sharma : रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यात खेळण्याची शक्यता, विराट कोहली अन् जसप्रीत बुमराहचं काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंगSpecial Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
Embed widget