Team India Won Series : टीम इंडियाने (Team India) झिम्बाब्वेला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Zimbabwe) पराभूत करत मालिका नावावर केली आहे. विशेष म्हणजे भारताने झिम्बाब्वेला 3-0 च्या फरकाने मात देत व्हाईट वॉश दिला आहे. या विजयामुळे भारताने झिम्बाब्वेला क्लिन स्वीप दिल्यामुळे विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये अगदी आनंदी वातावरण होतं. सर्व खेळाडू तुफान असा जल्लोष करताना दिसत होते.


शिखर धवनने (Shikhar Dhawan) हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडू डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओत काला चष्मा या बॉलीवुड साँगवर खेळाडू नाचत असून ईशान किशन, शुभमन गिल, शिखर धवन हे सर्वाधिक धमाल करताना दिसत आहेत. 


पाहा संपूर्ण व्हिडीओ-









सामन्याचा लेखा-जोखा


सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारत मैदानात आला. सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताच्या डाव पुढे नेला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी झाली. भारताची धावसंख्या 63 वर असताना केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. या सामन्यात केएल राहुल 46 चेंडूत 30 धावा करून माघारी परतला.  ब्रॅडली इवांसनं त्याला बाद केलं. त्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं इशान किशनसोबत 140 धावांची शतकी भागेदारी करत संघाचा डाव सावरला. ईशान किशन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं 82 चेंडूत त्याचं एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलं शतक पूर्ण केलं. या सामन्यातील अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळताना शुभमन गिल बाद झाला. या सामन्यात भारतानं 50 षटकात आठ विकेट्स गमावून 289 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलनं 130 धावांची खेळी केली. ज्यात 15 षटकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. दरम्यान, झिम्बाब्वेच्या ब्रॅडली इवांसनं जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानं 10 षटकात 54 धावा खर्च करून भारताच्या 5 फलंदाजांना माघारी धाडलं. 


290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात खास झाली नाही. त्यांचे सुरुवातीचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. पण सिन विल्यम्सने सिकंदर रझासोबत मिळून संघाचा डाव सावरला. सिन 45 धावा करुन बाद झाला खरा पण सिकंदरने पुढे डाव कायम ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. पण 49 व्या षटकात सिकंदर 115 धावा करुन बाद झाला. त्याने 95 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पण शार्दूलने त्याला 49 व्या षटकात शुभमनच्या हाती झेलबाद करवलं. त्यानंतरही झिम्बाब्वे जिंकेल असं वाटत होतं, पण आवेशनं अखेरच्या षटकात उर्वरीत फलंदाजांना बाद करत झिम्बाब्वेचा डाव 276 धावांवर रोखत भारताला 13 धावांनी विजयी करुन दिलं. आवेशन 3 अक्षर, कुलदीप आणि दीपक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. शार्दूलनं महत्त्वपूर्ण अशी एक सिकंदरची विकेट घेतली.


हे देखील वाचा-