Virat Kohli Form : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. यात भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान यंदा या स्पर्धेत माजी कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) अनेकांचं लक्ष असणार आहे. त्यात विराटचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्डही दमदार असल्याने त्याच्याकडे सुरुवातीपासून सर्वांचे खास लक्ष असेल. बऱ्याच काळानंतर तो मैदानात उतरणार असून अशामध्ये अनेक टीकाकारांमध्ये माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) कोहलीची बाजू घेत त्याची पाठराखण केली आहे. कोहलीला त्याने इतिहासातील एक महान क्रिकेटर असं म्हणत 'फॉर्म तात्पुरता असू शकतो, पण क्लास पर्मनंट असतो' (Form is temporary class is Permanent) असंही म्हटला आहे. 


कोहली काही काळाच्या ब्रेकनंतर पुन्हा मैदानात परतणार आहे. कोहलीने भारताकडून पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या असून आता पाकिस्ताविरुद्धच तो मैदानात उतरणार असल्याने त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. विराट गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. पण आता तो पुन्हा फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत. 


विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज


विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द


विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.


हे देखील वाचा-