IND vs ZIM, 3rd ODI : भारतीय संघाने (Team India) आपली विजयी घोडदौड कायम ठेवत तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या सामन्यात 13 धावांनी विजय मिळवत झिम्बाब्वेला (India vs Zimbabwe) व्हाईट वॉश दिला आहे. सामन्यात आधी फलंदाजीवेळी शुभमन गिलचं (Shubhman Gill) दमदार असं शतक आणि गोलंदाजीत अखेरच्या षटकात शार्दूल, आवेश जोडीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारत जिंकला आहे. पण सामन्यात पराभूत संघ झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज सिकंदर रझा (Sikandar Raza) याने साऱ्यांचीच मनं जिंकली. शतक ठोकत त्याने संघाला अगदी विजयाजवळ आणलं पण काही धावा हव्या असताना तो झेलबाद झाल्याने झिम्बाब्वेचा संघ थोडक्यात पराभूत झाला आहे.






सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारत मैदानात आला. सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताच्या डाव पुढे नेला. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 79 चेंडूत 50 धावांची भागेदारी झाली. भारताची धावसंख्या 63 वर असताना केएल राहुलच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. या सामन्यात केएल राहुल 46 चेंडूत 30 धावा करून माघारी परतला.  ब्रॅडली इवांसनं त्याला बाद केलं. त्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं इशान किशनसोबत 140 धावांची शतकी भागेदारी करत संघाचा डाव सावरला. ईशान किशन बाद झाल्यानंतर शुभमन गिलनं 82 चेंडूत त्याचं एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलं शतक पूर्ण केलं. या सामन्यातील अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळताना शुभमन गिल बाद झाला. या सामन्यात भारतानं 50 षटकात आठ विकेट्स गमावून 289 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलनं 130 धावांची खेळी केली. ज्यात 15 षटकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. दरम्यान, झिम्बाब्वेच्या ब्रॅडली इवांसनं जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानं 10 षटकात 54 धावा खर्च करून भारताच्या 5 फलंदाजांना माघारी धाडलं. 


290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात खास झाली नाही. त्यांचे सुरुवातीचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. पण सिन विल्यम्सने सिकंदर रझासोबत मिळून संघाचा डाव सावरला. सिन 45 धावा करुन बाद झाला खरा पण सिकंदरने पुढे डाव कायम ठेवत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. पण 49 व्या षटकात सिकंदर 115 धावा करुन बाद झाला. त्याने 95 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पण शार्दूलने त्याला 49 व्या षटकात शुभमनच्या हाती झेलबाद करवलं. त्यानंतरही झिम्बाब्वे जिंकेल असं वाटत होतं, पण आवेशनं अखेरच्या षटकात उर्वरीत फलंदाजांना बाद करत झिम्बाब्वेचा डाव 276 धावांवर रोखत भारताला 13 धावांनी विजयी करुन दिलं. आवेशन 3 अक्षर, कुलदीप आणि दीपक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. शार्दूलनं महत्त्वपूर्ण अशी एक सिकंदरची विकेट घेतली.


हे देखील वाचा-