ZIM Vs IND: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 5 विकेट्सनं विजय, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे
ZIM vs IND 2nd ODI: झिब्बावेविरुद्ध खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतानं 5 विकेट्सनं विजय मिळवलाय.
![ZIM Vs IND: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 5 विकेट्सनं विजय, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे Ind vs Zim 2022, 2nd ODI: India Beat Zimbabwe by Five Wickets to Win Series With a Match Remaining ZIM Vs IND: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 5 विकेट्सनं विजय, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/20/8c70b3f9d604b3fa815e586f01bfae2f1661004946875266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ZIM vs IND 2nd ODI: झिब्बावेविरुद्ध खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतानं 5 विकेट्सनं विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातलीय. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ 38.1 षटकांत 161 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतानं 25.4 षटकात 5 विकेट्स गमावून 167 धावा करत सामना जिंकला.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे दहा महत्वाचे मुद्दे-
- या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाबेच्या संघाची खराब सुरुवात झाली. झिम्बाब्वेनं 30 धावांच्या आत तीन विकेट्स गमावले.
- झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सनं सर्वाधिक 42 धावा केल्या. तर, रायन बर्लेनं नाबाद 39 धावांचं योगदान दिलं.
- भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 161 धावांवर आटोपला.
- भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
- झिम्बाब्वेनं दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का कर्णधार केएल राहुलच्या रुपात पहिला झटका बसला. या सामन्यात केएल राहुलला फक्त एक धाव करता आली.
- त्यानंतर धवन आणि गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली.
- मात्र, 21 चेंडूत 33 धावा करून धवन बाद झाला. त्यानंतर इशान किशनही 6 धावा करून बाद झाला. गिलही 34 चेंडूत 33 धावा केल्यानंतर काही वेळानं बाद झाला.
- दरम्यान, संजू सॅमसननं झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवत भारताला सामना जिंकून दिला.
- झिम्बाब्वेकडून ल्यूक जाँगवेनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाला पराभूत करून भारतानं मालिका खिशात घातली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं दहा विकेट्सनं झिम्बाब्वेचा पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा 5 विकेट्सनं पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील तिसरा सामना औपचारिकता म्हणून खेळला जाईल, जो 22 ऑगस्ट रोजी हेरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)