IND vs WI 5th T20 Live Streaming : भारताचा 88 धावांनी विजय, सामन्यासह मालिकाही जिंकली

India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात पाचवा टी20 सामना पार पडत आहे. भारताने आधीच पाच पैकी तीन सामने जिंकत मालिका खिशात टाकली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Aug 2022 11:40 PM

पार्श्वभूमी

India vs West Indies LIVE : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात पाचवा टी20 सामना पार पडत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला, तिसरा आणि  चौथा सामना जिंकत 3-1 ची विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका आधीच भारताच्या खिशात गेली आहे. पण आजचा सामना जिंकून एका मोठ्या फरकाने मालिका विजयाचा भारताचा निश्चय असेल, दुसरीकडे वेस्ट इंडीज अखेरचा सामना जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे.  


आजच्या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 चा विचार करता विशेष गोष्ट म्हणजे कुलदीप यादवला संधी मिळाली आहे. तसंच ईशान, श्रेयस आणि दीपक हुडाला संघात घेतलं आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार विश्रांतीवर आहेत. तर नेमका संघ कसा आहे पाहूया...


भारतीय संघ - ईशान किश, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दीक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, आवेश खान, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आणि अर्शदीप सिंह 



वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.      




हे देखील वाचा-



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.