IND vs WI 3rd ODI : रोहित-धवन करणार ओपनिंग, तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला अशी असेल Playing 11
India vs West Indies 3rd ODI, Team India Playing 11: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी होणार आहे.
![IND vs WI 3rd ODI : रोहित-धवन करणार ओपनिंग, तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला अशी असेल Playing 11 ind vs wi 3rd odi rohit sharma shikhar dhawan will open team india likely playing 11 in third odi IND vs WI 3rd ODI : रोहित-धवन करणार ओपनिंग, तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला अशी असेल Playing 11](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/10/151bc3e0d8a4662e24fb847bbeeba46f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs West Indies 3rd ODI, Team India Playing 11: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी होणार आहे. भारतीय संघाने तीन सामन्याची मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात काही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिखर धवन आणि रोहित शर्मा करणार ओपनिंग !
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्माने तिसऱ्या सामन्याला धवन संघामध्ये परतेल, असे संकेत दिले होते. तिसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना आराम दिला जाऊ शकतो. त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांना संधी मिळू शकते.
वेगवान गोलंदाजीमध्ये सिराजला आरम दिला जाण्याची शक्यता आहे. त्याजाघी युवा आवेश खानला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चाहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कुलदीप यादवलाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाची संभावित प्लेइंग इलेव्हन-
शिखर धवन, रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, दीपक चाहर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
भारताविरुद्ध वेस्टइंडिजचं खराब प्रदर्शन
भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. वेस्ट इंडीजला भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या सलग 11 एकदिवसीय मालिका गमवाव्या लागल्या आहेत. 2007 पासून वेस्ट इंडीजला भारताविरुद्ध एकही मालिका जिंकता आली नाही. वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला अखेर 2006 मध्ये त्यांच्या मायदेशात 4-1 नं पराभूत केलं होतं.
एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिकेचा जिंकण्याचा विक्रम
एका संघात सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा पाकिस्तान आहे. पाकिस्ताननं 1999 के 2017 पर्यंत वेस्ट इंडीजच्या संघाला सलग 9 मालिकेत धूळ चाखली आहे. चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे नाव आहे. दक्षिण आफ्रिकेनं झिम्बाब्वेविरुद्ध 1995-2018 दरम्यान सलग 9 एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारतीय संघाचे नाव पुन्हा पाचव्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने 2007 ते 2021 दरम्यान सलग 9 वनडे मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)