IND vs WI, 2nd T20I, Toss Update : आजही वेस्ट इंडीजने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी20 सामना खेळवला जात असून नुकतीच नाणेफेक झाली आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
India vs West Indies Toss Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज दुसरा टी20 सामना पार पडत आहे. 8 वाजता सुरु होणाऱ्या सामन्याची वेळ बदलल्यामुळे आता सामना 11 वाजता सुरु होत आहे. दरम्यान सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला आहे. भारताला कमी धावांमध्ये रोखून मग लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा निर्धार वेस्ट इंडीजचा आहे.
एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने भारताने जिंकले आणि वेस्ट इंडीजला 39 वर्षांत प्रथमच त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला. ज्यानंतर आता भारत टी20 मालिकाही जिंकून एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे, आजचा सामना जिंकून मालिकेतील आघाडी वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असून वेस्ट इंडीज बरोबरी करण्यासाठी मैदाणात उतरणार आहे. दरम्यान आजचा सामना होणाऱ्या मैदानात भारत पहिलाच सामना खेळत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजने मात्र याठिकाणी 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील 6 जिंकले देखील आहेत.याशिवाय दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, हार्दीक पांड्या,दिनेश कार्तिक, आवेश खान, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह
वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.
हे देखील वाचा-