IND vs WI, 1st ODI Live : भारताचा वेस्ट इंडीजवर 3 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी
IND vs WI, 1st ODI, Queen Park Oval Stadium: आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत असून पहिला सामना आज खेळवला जात आहे.
LIVE
Background
Ind vs WI- 1st ODI Live Blog : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील सुरुवात होत आहे. ज्यातील पहिला एकदिवसीय सामना (1st ODI) त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) याठिकाणी खेळवला जाणार आहे. क्विवन्स पार्क ओव्हल स्टेडियममध्ये (Queen Park Oval Stadium) होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघातून युवा खेळाडूंची फौज मैदानात उतरणार असेल. दरम्यान मालिकेतील हा पहिलाच सामना असल्याने सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 ची आघाडी घेईल. भारताने नुकतच इंग्लंडला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय आणि टी20 मालिकेत मात दिल्यानंतर आता वेस्ट इंडीजला मात देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
भारतीय संघात या मालिकेसाठी दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे संघाचा कर्णधार रोहित शर्माही संघात नसून शिखर धवन यावेळी कर्णधार असणार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडू मैदानात उतरतील. दरम्यान यावेळी संघाची धुरा युवा खेळाडूंवर असल्याने दोन्ही संघामधील हे सामने चुरशीचे होण्याची दाट शक्यता आहे.
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
हे देखील वाचा-
- World Athletics Championships 2022: रोहित यादवचं नीरज चोप्राच्या पावलावर पाऊल, 80.42 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली!
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!
IND vs WI : भारत 3 धावांनी विजयी
आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले. ज्यामुळे भारत 3 धावांनी विजयी झाला.