(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs SL : युवा खेळाडूंमुळं दिग्गज खेळाडूच्या परतीचे मार्ग बंद? टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू श्रीलंका दौऱ्यातून बाहेर
IND vs SL : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत टी 20 मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : भारताचा श्रीलंका दौरा पुढील आठवड्यापासून होत आहे. तीन टी 20 सामने आणि तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. गौतम गंभीरचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ या दौऱ्यापासून सुरु होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली अखेर एकदिवसीय सामन्यात खेळणार हे स्पष्ट झालंय. तर, टी 20 क्रिकेट टीमचा कॅप्टन कोण असणार या प्रश्नाचं उत्तर देखील भारतीय क्रिकेट चाहत्यांना मिळालेलं आहे. सूर्यकुमार यादव टी 20 क्रिकेटमध्ये भारताचं नेतृत्त्व करणार आहे. या सर्व गोष्टींमुळं संघ निवडीकडे भारतातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. झिम्बॉब्वे दौरा गाजवणाऱ्या अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी न मिळाल्यानं चाहत्यांनी रोष व्यक्त केलाय. याशिवाय दुसरीकडे वनडे संघात एका दिग्गज खेळाडूला संधी मिळालेली नाही. त्या खेळाडूचं नाव रवींद्र जडेजा असं आहे.
रवींद्र जडेजाची टी 20 मधून निवृत्ती,वनडेत संधी हुकली
रवींद्र जडेजानं रोहित शर्मा, विराट कोहली प्रमाणं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळं श्रीलंका दौऱ्यात वनडे मालिकेत त्याला संधी मिळणार का हा प्रश्न होता. मात्र, निवड समितीनं श्रीलंका दौऱ्यासाठी रवींद्र जडेजाच्या नावाचा विचार केलेला नाही. रवींद्र जडेजा ऐवजी युवा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या नावांचा विचार करत त्यांची निवड करण्यात आली आहे.
रवींद्र जडेजानं 74 टी20 सामने भारताकडून खेळले. त्यात 515 धावा केल्या आणि 54 विकेट घेतल्या. तर, त्यानं वनडेमध्ये 197 सामने खेळले. जडेजानं यामध्ये 2756 धावा केल्या तर 220 विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 72 मॅचेस खेळल्या असून 3036 धावा केल्या तर 294 विकेट घेतल्या आहेत.
वनडे मालिकेसाटी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
वनडे मालिकेचं वेळापत्रक काय ?
पहिला वनडे सामना - शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो
दुसरा वनडे सामना - रविवार, 4 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो
पहिला वनडे सामना - बुधवार, 7 ऑगस्ट 2024 - दुपारी 2.30 वाजता - आर. प्रेमदासा स्टेडियम - कोलंबो
संबंधित बातम्या :
नताशाला हार्दिक पांड्याकडून पोटगी मिळणार का? पोटगीचं नेमकं गणित काय? वाचा!