IND vs SL T20I Score Live: पहिल्या टी20त भारताचा थरारक विजय, श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव
IND vs SL T20I Score Live: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे.
LIVE
Background
IND vs SL 1st T20: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ मैदानात उतरणार आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. यातील 17 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, 8 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. भारतानं घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत एकूण 14 टी-20 सामने खेळले आहेत. यातील 14 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात श्रीलंकेच्या संघाला बाजी मारता आली. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरलाय.
कसं असेल श्रीलंकेचा भारत दौरा?
येत्या 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका सुरू होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 5 जानेवारीला पुण्यात आणि 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर लगेच 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरूवात होईल. पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथे होणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारीला आणि तिसरा सामना 15 जानेवारीला होणार आहे.
Inching closer to the #INDvSL T20I series opener! ⏳ 👏
— BCCI (@BCCI) January 3, 2023
Follow the match ▶️ https://t.co/x0tupH98nB#TeamIndia | @mastercardindia pic.twitter.com/FDVy3LrCso
श्रीलंकेचा टी-20 संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.
भारताचा टी-20 संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.