IND vs SL New Schedule: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात पार पडणाऱ्या आगामी कसोटी आणि टी20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. आधी कसोटी मालिका आणि नंतर टी20 मालिका पार पडणार होती. पण आता नव्या बदलानुसार आधी टी20 आणि नंतर कसोटी मालिका पार पडेल. 24 फेब्रुवारीपासून टी20 तर 4 मार्चपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

Continues below advertisement

याआधी 25 फेब्रुवारी रोजी पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार होती. 25 फेब्रुवारी ते 1 मार्च पहिली कसोटी, त्यानंतर 5 मार्च ते 9 मार्च दुसरी कसोटी खेळवली जाणार होती. ज्यानंतर 13 मार्च, 15 मार्च आणि 18 मार्च हे तीन दिवस पहिला, दुसरा आणि तिसरा टी20 सामना खेळवला जाणार होता. पण आता आधी टी20 मालिका पार पडणार असून नंतर कसोटी मालिका खेळवली जाईल.

असं असे नवं वेळापत्रक?

दिवस दिनांक सामना ठिकाण
गुरुवार 24 फेब्रुवारी पहिला टी20 सामना लखनौ
शनिवार 26 फेब्रुवारी दुसरा टी20 सामना धर्मशाला
रविवार 27 फेब्रुवारी तिसरा टी20 सामना धर्मशाला
शुक्रवार 4 मार्च ते 8 मार्च पहिला कसोटी सामना मोहाली
शनिवार 12 मार्च ते 16 मार्च   दुसरा कसोटी सामना बंगळुरु

 हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha