India vs New Zealand 2nd Women's ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे. 7 विकेटच्या मोबदल्यात 49 ओव्हमध्ये न्यूझीलंडच्या संघाने 271 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. न्यूझीलंडच्या महिला संघाने हा सामना 3 विकेट आणि एक ओव्हर राखून जिंकला आहे. न्यूझीलंडच्या अमेलिया केरच्या नाबाद 119 धावांमुळे न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील दुसरा विजय मिळवला आहे.
भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला यांच्यात आजदुसरा एकदिवसीय क्रिकेटचा सामना झाला.यामध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाल्यानंतर या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने सावध सुरूवात केली होती. भारताने 50 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 271 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडसोमर ठेवले होते. यामध्ये मिताली राज आणि ऋचा घोष यांनी अर्धशतके झळकावली होती. मिताली राजने 81 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली होती तर ऋचा घोषने 64 बॉलमध्ये 65 धावांची खेळी केली होती. मात्र, न्यूझीलंडच्या महिला संघाने दमदार कामगिरी करत भारताचा पराभव केला आहे. अमेलिया केराने नाबाद 119 धावांचा धडाकेबाज खेळी केली आहे.
दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्या भारतीय संघाची काामगिरी समाधानकारक राहिली नव्हती. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला आपली कामगिरी उंचावणे महत्त्वाचे होते. त्यानुसार य सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी करत 271 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 275 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 213 धावांवर आटोपला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : यंदा दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नाही जोफ्रा आर्चर, तरी मुंबईने 8 कोटींना घेतलं विकत, कारण काय?
- IND vs WI, 1st T20I: पहिला टी-20 सामना प्रेक्षकांविना! अखेरच्या दोन सामन्यात प्रेक्षकांना परवानगी द्यावी, CAB ची BCCI ला विनंती
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा