IND vs WI, T20 Series: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात भारतीय भूमीवर मर्यादीत षटकांचे सामने सुरु आहेत. पहिले दोन्ही एकदिवसीय सामने जिंकत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. ज्यानंतर आता टी20 मालिकाही जिंकण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. पण या मालिकेपूर्वीच भारताचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेले आहेत. यात संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि अष्टपैलू अक्षर पटेल (Akshar Patel) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांना संघात स्थान मिळालं आहे. 16 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी20 सामन्यांची सुरुवात होणार आहे.



राहुलला क्षेत्ररक्षण करताना डाव्या हाताच्यावरच्या बाजूस ताण आल्यामुळे दुखापत झाली आहे. तर अक्षर हा कोरोनाबाधित झाल्यानंतर त्याच्यावरील उपचारही अंतिम स्टेजमध्ये आहेत. पण तो या आगामी मालिकेत मात्र खेळणार नसून ते दोघेही बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत दुखापतींवरील पुढील उपचारासाठी पोहोचणार आहेत. त्या दोघांना रिप्लेसमेंट म्हणून ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांना टी20 संघात स्थान देण्यात आलं आहे.  


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ


रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, युझवेंद्र चहल, वॉशिग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, दीपक हुडा.


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 वेळापत्रक


16 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha