IPL Auction 2022 Updates: भारतानं नुकताच अंडर 19 विश्वचषक जिंकला, युवा खेळाडूंनी सुरुवातीपासून अप्रतिम खेळ दाखवत ही स्पर्धा जिंकली. दरम्यान या त्यांच्या कामगिरीमुळे आगामी आयपीएलमध्ये त्यांना घेण्यासाठी संघ उत्सुकता दाखवणार हे नक्कीच होते. त्यानुसार अंडर 19 संघातील खेळाडूंवर मोठी बोली लागली. यामध्ये कर्णधार यश धुलपेक्षा महाराष्ट्रातील उस्माणाबादच्या राजवर्धन हंगरगेकरवर अधिक बोली लागली. यशला दिल्ली संघाने 50 लाखांना खरेदी केलं. तर राजवर्धनवर काही संघानी चुरशीची बोली लावली, ज्यात अखेर चेन्नई सुपरकिंगने 1.50 कोटी देत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. त्यामुळे आता ऋतुराज गायकवाडनंतर आणखी एक महाराष्ट्राचा खेळाडू चेन्नईमधून खेळताना दिसेल.


राजवर्धन एक अष्टपैलू खेळाडू असल्याने अशा खेळाडूंना कायमच मागणी असते. राजवर्धनसह अंडर 19 संघातील आणखी एक अष्टपैलू खेळाडू राज बावा (Raj Bawa) याच्यावरही तगडी बोली लागली. राज बावावर 20 लाखांची बेस प्राइस लावण्यापासून सुरुवात झाली. ज्यानंतर अखेर पंजाब किंग्सने त्याला 2 कोटी रुपयांना खरेदी केले. 


महाराष्ट्राचा अजिंक्य रहाणे केकेआरमध्ये


अजिंक्य रहाणे मागील काही काळापासून खास फॉर्ममध्ये नसल्याने भारतीय संघात स्थान मिळणं अवघड झालं आहे. त्यामुळे यंदा आयपीएलमध्येही त्याच्यावर खास बोली लागली नाही. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला एक कोटी रुपयांना विकत घेतले. रहाणेला यंदा अंतिम 11 मध्ये संधी मिळणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha