(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL 3rd T20I Live Streaming : भारत विजयाच्या उंबरठ्यावर, श्रीलंका संघाचे 9 गडी बाद
IND vs SL : पहिली टी20 मॅच जिंकल्यानंतर दुसरी मॅच भारतीय संघाने गमावली. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. ज्यामुळे आजचा तिसरा टी20 सामना निर्णायक असणार आहे.
LIVE
Background
India vs Sri Lanka 3rd T20 : श्रीलंका क्रिकेट संघ (Team Sri Lanka) सध्या भारताच्या दौऱ्यावर असून टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जात आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. पहिली टी20 मॅच जिंकल्यानंतर दुसरी मॅच भारतीय संघाने गमावली. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. ज्यामुळे आजचा तिसरा टी20 सामना निर्णायक असणार आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आजवरच्या इतिहासाचा विचार केला तर दोन्ही संघ आतापर्यंत 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यातील 18 सामने भारतानं जिंकल्यामुळे भारताच पारडं कमालीचं जड दिसून येत आहे. तर, 9 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. याशिवाय दोन्ही संघामधील एक सामना अनिर्णित देखील सुटला आहे. ज्यानंतर आज दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध 29 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे सध्या सुरु मालिकेत दोन्ही संघानी कमाल कामगिरी करत एक-एक सामना जिंकल्याने आज एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.
कसा आहे पिच रिपोर्ट?
राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यातील खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण ही सपाट खेळपट्टी गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करते. फलंदाजांना येथे फलंदाजी करणे खूप सोपे जाईल. तसंट, गोलंदाजांना योग्य लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करणं अनिवार्य असणार आहे. आजची खेळपट्टी फलंदाजांना पूर्णपणे साथ देणारी आहे. सपाट खेळपट्टीसह येथील चौकार ही लहान असल्याने फलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरतील. सीमारेषेची लांबी सुमारे 65-70 मीटर असेल. या खेळपट्टीनुसार आज एक मोठा स्कोअर उभा राहून हायस्कोरिंग सामना पाहायला मिळेल.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा टी20 संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
श्रीलंका टी20 संघ:
दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा