एक्स्प्लोर

IND Vs SL, 2nd Test: बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्डेडियमवर जसप्रीत बुमराहनं रचला विक्रम

IND Vs SL, 2nd Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.

IND Vs SL, 2nd Test: बंगळुरुच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीस बुमराहनं श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना माघारी घाडलं आहे. डे-नाईट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. 

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ 252 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून श्रेयस अय्यरनं 92 धावांची झुंजार खेळी साकारली. त्यानंतर फलंदाजी करण्यासा्ठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. श्रीलंकेचा संघाला पहिल्या डावात 109 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतानं पहिल्या दिवशी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही नेत्रदीपक कामगिरी करत 143 धावांची आघाडी घेतली आहे. 

जसप्रीत बुमराहची चमकदार कामगिरी
या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहनं कुशल मेंडिस, लाहिरू थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज आणि डिकवेलसारख्या फलंदाजांना बाद केलं. त्यानं 10 षटकात 24 धावा देत 5 विकेट्स घेतले. बुमराहनं 4 निर्धाव षटक टाकली. बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात जसप्रीत बुमराहनं 24 धावा देऊन 5 विकेट्स घेतले. 

जसप्रीस बुमराहनं इशान शर्माचा विक्रम मोडला
कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भारताचा वेगवान गोलंदाज इशान शर्माच्या नावावर होता. श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटी सामन्यात इशांतनं 54 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना 2015 साली खेळला गेला होता. या यादीत व्यंकटेश प्रसाद तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 2001 साली कॅंडी येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने 72 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर झहीर खाननेही मुंबई कसोटीत ही अप्रतिम कामगिरी केली होती. झहीरनं 72 धावांत 5 विकेट्स घेतले होते.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai North Lok Sabha Groud Report : उत्तर मुंबई मतदारसंघात कुणाची हवा? पियुष गोयल vs भूषण पाटीलKalyan Lok Sabha Ground Report : कल्याणचा फैसला कुणाचा? श्रीकांत शिंदे vs वैशाली दरेकरArvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शनUddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
Embed widget