IND Vs SA : ऋषभ पंतकडे भारतीय संघाचं नेतृत्व, हार्दिक पांड्यालाही मिळाली मोठी जबाबदारी
Rishabh Pant as Captain and Hardik Pandya as vice-captain : केएल राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशात होणाऱ्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेतून बाहेर गेलाय.
Rishabh Pant as Captain and Hardik Pandya as vice-captain : केएल राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशात होणाऱ्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेतून बाहेर गेलाय. त्यामुळे ऋषभ पंतकडे भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नियमीत कर्णधार रोहित शर्माला आराम दिल्यामुळे दक्षिण आफ्रिकाविरोधात राहुलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पण राहुलही दुखापतीमुळे मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने ऋषभ पंतके भारतीय संघाची धुरा सोपवली आहे. ऋषभ पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिट्ल्स संघाचं नेतृत्व केलेय.
आयपीएल 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाला आयपीएल चषक जिंकून देणाऱ्या हार्दिक पांड्याकडे बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात हार्दिक पांड्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऋतुराज गायकवाड याची प्लेईंग 11 मधील जागा जवळपास निश्चित मानली जातेय. ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन सलामीला येण्याची शक्यता आहे.
राहुल-कुलदीप दुखापतग्रस्त -
दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशी होणाऱ्या पाच टी 20 सामन्याच्या मालिकेला गुरुवारी 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच केएल राहुल आणि कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाले आहेत. हे दोन्ही खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाद झालेत. कुलदीप यादवला नेटमध्ये सराव करताना दुखापत झाली आहे. पण राहुलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयने सांगितलेल्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडू एनसीएमध्ये दाखल होतील. तिथे ते आपल्या फिटनेसवर काम करतील. तंदुरुस्त झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंचा पुढील मालिकेसाठी विचार करण्यात येईल.
दक्षिण आफ्रिकाविरोधात भारतीय संघ (India’s T20I squad) -
ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चाहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
KL Rahul has been ruled out of the T20I series against South Africa owing to a right groin injury while Kuldeep Yadav will miss out in the T20I series after getting hit on his right hand while batting in the nets last evening.
— BCCI (@BCCI) June 8, 2022
More details here - https://t.co/KDJwRE9tCz #INDvSA
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 9 जून | अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली |
दुसरा टी20 सामना | 12 जून | बाराबती स्टेडियम, कट्टक |
तिसरा टी20 सामना | 14 जून | डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम |
चौथा टी20 सामना | 17 जून | सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट |
पाचवा टी20 सामना | 19 जून | एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु |