IND vs SA: अर्शदीप सिंहची जबरदस्त गोलंदाजी; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारी खेळ्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 8 विकेट्सनं (India vs South Africa) विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय.
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारी खेळ्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 8 विकेट्सनं (India vs South Africa) विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 नं आघाडी घेतलीय. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) महत्वाची भूमिका बजावली. आपल्या स्पेलमधील पहिल्याच षटकात अर्शदीपनं दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. अर्शदीप आणि दीपक चाहरच्या (Deepak Chahar) भेदक माऱ्यानंतर अवघ्या 9 धावांवर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या अर्शदीप सिंहला नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय.
अर्शदीप सिंहनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केलीय. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील दुसऱ्या षटकात कर्णधार रोहित शर्मा अर्शदीपकडं चेंडू सोपवला. याच षटकात त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजाला माघारी धाडलं. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्यानं क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock) बाद केलं. त्यानंतर पाचव्या चेंडूवर रिली रॉसो (Rilee Rossouw) आणि सहाव्या चेंडूवर डेव्हिड मिलरला (David Miller) मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्याच्या पॉवर प्लेमध्ये तीन विकेट्स घेणारा अर्शदीप सिंह पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची भेदक गोलंदाजी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अर्शदीपनं चार षटकात 32 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. अर्शदीपसह दीपक चाहर आणि हर्षल पटेलनंही चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात दीपक चाहर आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. तर, अक्षर पटेलच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.
दक्षिण आफ्रेकेचा भारत दौरा
टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. यानंतर 6 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आता 2 ऑक्टोबरला दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 4 ऑक्टोबरला इंदूरमध्ये पार रडणार आहे.
हे देखील वाचा-