एक्स्प्लोर
Wildlife Smuggling: मुंबई विमानतळावर सापांचा सुळसुळाट, महिलेच्या बॅगेत सापडले 4 Anaconda, Zareen Shaikh ला अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) सीमा शुल्क विभागाने (Customs Department) मोठी कारवाई करत प्राणी तस्करीचा (Animal Smuggling) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी झरीन शेख (Zareen Shaikh) नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने झरीन शेख नावाच्या महिला प्रवाशाला अटक केली असून, तिच्याकडून तस्करी करण्यात आलेले १५४ प्राणी जप्त करण्यात आले आहेत. थायलंडमधून आणलेल्या या प्राण्यांमध्ये चार लहान अॅनाकोंडा (Anaconda), इग्वाना (Iguana), कासव (Tortoise) आणि विविध प्रजातींच्या सरड्यांचा समावेश आहे. हे सर्व प्राणी پلاستिकच्या डब्यांमध्ये भरून सुटकेसमध्ये लपवून आणले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाळीव प्राण्यांच्या वाढत्या मागणीमुळे अशा प्रकारची तस्करी वाढत आहे. जप्त केलेले प्राणी वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत संरक्षित आहेत आणि त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जाईल.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















