एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Karthik First T20 Fifty : तब्बल 16 वर्षानंतर दिनेश कार्तिकचं टी 20 मध्ये अर्धशतक

Karthik First T20 Fifty : कार्तिकने विस्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. कार्तिकने या खेळीदरम्यान दोन षटकार आणि नऊ चौकार लगावले. 

Karthik First T20 Fifty : दिनेश कार्तिकच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने चौथ्या टी 20 सामन्यात निर्धारित 20 षटकांत सहा बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. दिनेश कार्तिकने मोक्याच्या क्षणी 27 चेंडूत 55 धावांची खेळी केली. दिनेश कार्तिकचं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील हे पहिलेच अर्धशतक होय. तब्बल 16 वर्षांपासून दिनेश कार्तिक टी 20 क्रिकेट खेळत आहे. पण त्याला अर्धशतक अद्याप झळकावता आले नव्हते. आज कार्तिकने विस्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. कार्तिकने या खेळीदरम्यान दोन षटकार आणि नऊ चौकार लगावले. 

भारताने 16 वर्षापूर्वी एक डिसेंबर 2006 मध्ये पहिला टी 20 सामना खेलला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघाने जवळपास 160 पेक्षा जास्त टी 20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, पहिला टी 20 सामना खेळणारा कार्तिक आताही भारतीय संघाचा सदस्य आहे. इतर सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.  

कार्तिक वगळता सर्व खेळाडू निवृत्त -
एक डिसेंबर 2006 रोजी भारताने दक्षिण आफ्रिकाविरोधात आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळला होता. तेव्हा वीरेंद्र सेहवाग भारताचा कर्णधार होता. त्यावेळी भारतीय संघात सचिन तेंदुलकर, दिनेश मोंगिया, महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, इरफान पठान, हरभजन सिंह, झहीर खान, एस श्रीसंत, अजित आगरकर आणि दिनेश कार्तिक खेळले होते. कार्तिक वगळता सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.   

भारताच्या पहिल्या टी 20 सामन्यात कार्तिकची मॅच विनिंग खेळी 
16 वर्षापूर्वी भारताच्या पहिल्या टी 20 सामन्यात दिनेश कार्तिकने मॅच विनिंग खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 126 धावा केल्या होत्या. भारताकडून मोक्याच्या क्षणी दिनेश कार्तिकने 31 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती.  या सामन्यात वीरेंद्र  सहवाग 34 आणि मोंगियाने 38 धावा केल्या होत्या. तर धोनी शून्य, सचिन 10 आणि रैना तीन धावांवर नाबाद होता.  

कार्तिकला संधी कमी - 
भारताला पहिला टी 20 सामना जिंकून देणाऱ्या कार्तिकला आतंरराष्ट्रीय टी 20 सामन्यात म्हणावी तशी संधी मिळाली नाही.  भारताने आतापर्यंत 150 पेक्षा जास्त टी 20 सामने खेळले आहेत. पण पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणाऱ्या कार्तिकला फक्त 35 सामन्यात संधी मिळाली आहे. दिनेश कार्तिकने भारताकडून अखेरचा टी 20 सामना 2019 मध्ये (दक्षिण आफ्रिकाआधी) खेळला होता.  

निदहास चषकात अखेरच्या चेंडूवर षटकार - 
बांग्लादेशविरोधात दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला निदाहास चषक जिंकून दिला होता. त्यानंतर कार्तिकला संधी मिळाली नाही. आश्चर्यकारक बाब म्हणजे, दिनेश कार्तिकला टी 20 सामन्यात अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नव्हतं.  पण आज झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकने वादळी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. 

आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी - 
दिनेश कार्तिकने 2022 आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. आयपीएलमधील विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर कार्तिकने पुन्हा एकदा भारतीय संघाचं दरवाजे उघडले आहेत. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकने184 च्या स्ट्राईक रेटने 330 धावांचा पाऊस पाडला होता. आता दिनेश कार्तिकने फिनिशर म्हणून भारतीय संघात पुनरागमन केलेय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget