IND vs SA: सूर्याचा शतकी तडाखा, यशस्वीचं वादळी अर्धशतक, भारताचा 201 धावांचा डोंगर
IND vs SA T20I Series: निर्णायक टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली. त्याशिवाय युवा यशस्वी जायस्वाल याने अर्धशतक ठोकले.
IND vs SA 3rd 1st Innings: निर्णायक टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवने शतकी खेळी केली. त्याशिवाय युवा यशस्वी जायस्वाल याने अर्धशतक ठोकले. दोघांच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारताने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 201 धावांचा डोंगर उभारला. सूर्यकुमार यादव याने 100 तर यशस्वी जायस्वाल याने 60 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून विल्यमस आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. आफ्रिकेला मालिका विजयासाठी 202 धावांचे आव्हान मिळाले आहे.
सूर्याचा शतकी तडाखा -
दोन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव याने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी करत शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 8 षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने टी 20 क्रिकेटमधील दुसरे शतक ठोकले. सूर्याने यशस्वी जायस्वाल याच्यासोबत शतकी भागिदारी केली. त्यानंतर रिंकूसोबत 47 धावांची भागिदरी केली. सूर्याने चौफेर फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 200 पार नेली.
यशस्वी जायस्वालचं अर्धशतक -
यशस्वी जायस्वाल याने आज शानदार खेळी केली. यशस्वीच्या बॅटमधून चौकार आणि षटकांराचा पाऊस पडला. यशस्वीने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि सहा चौकारांचा समावेस आहे. यशस्वी जायस्वाल याने सूर्यकुमार यादव याच्यासोबत 29 धावांची सलामी दिली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यासोबत शतकी भागिदारी केली. लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर यशस्वी जायस्वाल आणि सूर्याने मोर्चा संभाळला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत आफ्रिकेची गोलंदाजी फोडली. तिसऱ्या विकेटसाठी सूर्या आणि यशस्वी यांनी 70 चेंडूत 112 धावांची भागिदारी केली.
तिलक वर्मा गोल्डन डक -
शुभमन गिल माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने मैदानात येताच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्न केला, पण तो बाद झाला. तिलक वर्मिाने केशव महाराजचा चेंडू मिड-ऑफच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सर्कलच्या बाहेरही गेला नाही. चेंडू थेट कॅप्टन मार्करामच्या हातात विसावला. अशाप्रकारे तिलक वर्माला खाते न उघडताच तंबूत परत जावं लागलं. शुभमन गिल याने सहा चेंडूत 12 धावांची खेळी केली. जितेश शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी चार चार धावा काढता आल्या.
केशव महाराजने लागोपाठ दोन धक्के दिले..
टीम इंडियाने 'करो या मरो'च्या सामन्यात वेगवान सुरुवात केली. यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल यांनी पहिल्या दोन षटकात 29 धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने चेंडू केशव महाराज याच्याकडे सोपवाला. केशव महाराजने येताच लागोपाठ दोन विकेट घेतल्या. पहिल्या चेंडूवर त्याने शुभमन गिल याला तंबूत धाडले, तर त्यानंतर शून्यावर तिलक वर्माला तंबूचा रस्ता दाखवला. शुभमन गिलने महाराजचा चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला अन् एलबीडब्ल्यू बाद झाला. शुभमन गिल याने सहा चेंडूत 12 धावांची खेळी केली. तिलक वर्माला खातेही उघडता आले नाही.
आफ्रिकेची गोलंदाजी कशी राहिली ?
आफ्रिकेकडून केशव महाराज याने सर्वात प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 26 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. एल विल्यमस याने दोन विकेट घेतल्या, पण तो महागडा ठरला. त्याने चार षटकात 46 धावा खर्च केल्या. त्याशिवाय एन बर्गर याने आणि तरबेज शम्सी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.