(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA: विराट, केएल राहुलला विश्रांती; अर्शदीप सिंह संघाबाहेर; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
South Africa tour of India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जातोय.
South Africa tour of India: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून भारतानं आधीच मालिकेवर नाव कोरलंय. तर, तिसरा सामना जिंकून भारताचा पाहुण्या संघाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल. याचबरोरबर अखेरच्या टी-20 सामन्यात भारताला नमवून शेवट गोड करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरेल.
नाणेफेक करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मानं भारतीय संघात तीन बदल करण्यात आल्याची माहिती दिलीय. स्टार फलंदाज विराट कोहली, केएल राहुलला विश्रांती देण्यात आलीय. तर, किरकोळ दुखापतीमुळं अर्शदीप सिंह संघाबाहेर गेलाय. त्यांच्याऐवजी श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलंय. दुसरीकडं दक्षिण आफ्रिकेच्या संघात कोणताही करण्यात आला नाही.
भारताचा मालिकेवर कब्जा
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना तिरुवानंतपुरममध्ये खेळला गेला होता, जो भारतानं 8 धावांनी जिंकला. त्यानंतर गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 16 धावांनी पराभवाची धुळ चारली. यासह भारतानं पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टी-20 मालिकेत पराभूत केलंय.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.भारतीय महिला आणि मलेशिया महिला यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये कोणाचं पारडं जड?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 22 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 13 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं विजय मिळवलाय. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. संपूर्ण आकडेवारी पाहता टी-20 क्रिकेटमध्ये भारताचं पारडं जड दिसत आहे. मात्र, असं असनूही भारताला पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकता आलीय.
संघ-
भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रिली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हे देखील वाचा-