IND vs SA : भारत-द. आफ्रिकामध्ये दुसरा टी 20 सामना उद्या, कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग 11
IND vs SA 2nd T20I Match Preview : भारत आणिन दक्षिण अफ्रीका यांच्यातील तीन सामन्याच्या मालिकेतील दुसरा टी20 सामना मंगळवारी होणार आहे.
IND vs SA 2nd T20I Match Preview : भारत आणिन दक्षिण अफ्रीका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्याच्या मालिकेतील दुसरा टी20 सामना मंगळवारी होणार आहे. गकेबेरहा शहराच्या 'सेंट जॉर्ज पॉर्क' मध्ये सामना होणार आहे. आफ्रिकेत हा सामना सायंकाळी पाच वाजता सुरु होणार आहे, भारतामध्ये 8.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता उर्वरित दोन सामने जिंकणारा संघ मालिका जिंकणार आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तर आफ्रिकेची धुरा एडन मार्करमच्या खांद्यावर असेल.
खेळपट्टी कशी असेल ?
सेंट जार्ज पार्क मैदानात आतापर्यंत फक्त तीन टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवलाय. तर एका सामन्यात धावांचा पाठलाग करत विजय मिळवण्यात आलाय. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 179 इतकी आहे. या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी आहे. वेगवान गोलंदाज प्रभावी ठरु शकतात.
दोन्ही संघाची सभांव्य प्लेईंग 11
टीम इंडिया : यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड/शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मुकेश कुमार, कुलदीप यादव/रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
दक्षिण अफ्रीका : रीजा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रिटज्के, एडन मारक्रम, हेनिरक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, डोनोवन फेरिएरा, मार्को यान्सन/ आंदिले फेहलुख्वायो, केशव महाराज, जेराल्ड कोएत्जी, नांद्रे बर्गर, तबरेज शम्सी.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 हेड टू हेड
- सामने : 25
- भारत : 13
- दक्षिण आफ्रिका : 10
- निर्णय नाही : 02
दक्षिण आफ्रिकेत
- सामने: 07
- भारत : 05
- दक्षिण आफ्रिका : 02
सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात -
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला तीन सामन्यांची T20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळाणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे टी 20 संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वनडेमध्ये केएल राहुल कर्णधार असेल आणि कसोटी मालिकेत रोहित शर्मा धुरा संभाळणार आहे. दुसरा T20 सामना 12 डिसेंबरला आणि तिसरा T20 सामना 14 डिसेंबरला होणार आहे.
दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी20 स्क्वॉड
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.