IND vs SA, 2nd T20 Live Updates: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा चार विकेट्सनं पराभव

IND vs SA, 2nd T20 Live Updates: भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना कटकच्या बाराबती स्डेडियमवर खेळला जाणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jun 2022 10:29 PM
IND vs SA:  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा चार विकेट्सनं पराभव

IND vs SA 2nd T20: हेनरिक क्लासेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारताला चार विकेट्सनं पराभव केला. भारतानं दिलेल्या 149 दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकेच्या टॉपच्या तीन फलंदाजाला माघारी धाडून सामना टीम इंडियाच्या बाजुनं झुकवला. परंतु, हेनरिक क्लासेननं तुफानी फलंदाजी करत भारताच्या आशेवर पाणी सोडलं. पाच टी-20 सामन्याच्या मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय. 

IND vs SA: भुवनेश्वर कुमार आक्रमक मोडमध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजाला धाडलं माघारी

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून दक्षिण आफ्रिकेसमोर 148 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भारताकडून भुवनेश्वर कुमारनं आक्रमक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज माघारी धाडले.

IND vs SA: भारताची भेदक गोलंदाजी, दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज माघारी

भारतानं दिलेल्या 149 धावांचं पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची खराब सुरुवात झाली. ड्वेन प्रिटोरियस आणि रीझा हेंड्रिक्सच्या रुपात संघाला दोन झटके लागले आहेत. 

IND vs SA: भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 149 धावांचं लक्ष्य

IND vs SA, 2nd Innings Highlights: दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघानं गुडघे टेकले. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून 148 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरनं सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर, दक्षिण आफ्रिकडून एनरिक नॉर्टजे सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 149 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावजात? हे सामन्याच्या अखेरिस स्पष्ट होईल. 

IND vs SA, 2nd T20 Live: भारताचा निम्मा संघ माघारी, दक्षिण आफ्रिकेची भेदक गोलंदाजी

दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची छमछाक झाली. 98 धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी परतला आहे. भारताच्या डावातील सहा षटक शिल्लक आहेत. यामध्ये भारतीय संघ फलकावर किती धावा लगावतं हे पाहवं लागणार आहे.

IND vs SA, 2nd T20 Live: हार्दिक पांड्या आऊट, भारतानं चौथी विकेट्स गमावली

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारताची डगमग सुरुवात झालीय. भारताला हार्दिक पांड्याच्या रुपात चौथा झटका लागलाय. पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विशाल स्कोर उभा करूनही पराभूत झालेला भारतीय संघ आजच्या सामन्यात किती धावा करतोय? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

IND vs SA, 2nd T20 Live: ऋषभ पंतच्या रुपात भारताला तिसरा झटका 

ऋषभ पंतच्या रुपात भारताला तिसरा झटका लागलाय. आजच्या सामन्यात ऋषभ पंत मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, त्यानं केवळ सात चेंडूत पाच धावा केल्या आहेत.

IND vs SA, 2nd T20 Live: टीम इंडियाला दुसरा धक्का, ईशान किशन बाद

ईशान किशनच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का लागलाय. या सामन्यात त्यानं 21 चेंडूत 34 धावा केल्या.

IND vs SA, 2nd T20 Live: ऋतुराज बाद झाल्यानंतर ईशान किशन, श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सावरला

ऋतुराज गायकवाडच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का लागला. मात्र, त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सावरला

IND vs SA, 2nd T20 Live:  दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन

टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे

IND vs SA, 2nd T20 Live:  भारताची प्लेईंग इलेव्हन

इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान.

IND vs SA, 2nd T20 Toss Report: दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार 

IND vs SA, 2nd T20 Live: दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेनं भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय.कटकच्या बाराबती स्डेडियमवर हा खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ 1-1 नं बरोबरी साधण्यासाठी सज्ज झालाय. तर, या सामन्यात भारताला पराभूत करून 2-0 अशी आघाडी घेण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल. यामुळं आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचं ठरेल.

IND vs SA, 2nd T20 Live: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कधी, कुठे पाहायचा?

आज 12 जून रोजी होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल. हा सामना कटकच्या बाराबती मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.  

IND vs SA, 2nd T20 Live: भारत- दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सात सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.  आता देखील मालिकेतील पहिला सामना आफ्रिकेने जिंकत वर्चस्व घेतलं आहे.

पार्श्वभूमी

IND vs SA, 2nd T20 Live Updates: भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना कटकच्या बाराबती स्डेडियमवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ 1-1 नं बरोबरी साधण्यासाठी सज्ज झालाय. तर, या सामन्यात भारताला पराभूत करून 2-0 अशी आघाडी घेण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल. यामुळं आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 

भारत- दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सात सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.  आता देखील मालिकेतील पहिला सामना आफ्रिकेने जिंकत वर्चस्व घेतलं आहे.

कधी, कुठे पाहायचा सामना?
आज 12 जून रोजी होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल. हा सामना कटकच्या बाराबती मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.  

हे देखील वाचा-

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.