परभणी : परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील आयटीआय कॉर्नर परिसरात तुळजाभवानी मंदिर आहे. या मंदिर परिसराच्या बाजूलाच नॉन व्हेज हॉटेल उघडण्यात आले होते. या हॉटेलचालकाकडून मंदिर परिसरामध्ये घाण टाकण्यात येत असल्याचा आरोप करत आज शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद भरोसे यांनी थेट हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये जात त्यांनी हॉटेलचे लायसन्स आणि इतर कागदपत्र चेक केले. मात्र, ते सापडले नसल्याने त्यांनी हे हॉटेल बंद पाडले.
हॉटेल चालकावर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, हॉटेल चालकाकडून या मंदिर परिसरामध्ये हॉटेलची घाण टाकली जात असल्याची तक्रार काही स्थानिक महिलांनी आनंद भरोसे यांच्याकडे केली होती. त्यावरुन त्यांनी ही कारवाई केली आहे. यावेळी या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. मात्र, जर या हॉटेल चालकावर कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने कारवाई करु असा इशारा आनंद भरोसे यांनी प्रशासनाला दिला आहे.
कारवाई केली नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा
आनंद भरोसे यांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावर 100 वर्षापूर्वीचे जुने तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारचे लायसन्स नसतानाच नॉन व्हेज हॉटेल सुरु आहे. या हॉटेलकडून परिसरात घाण टाकली जात होती. त्यामुळं आम्ही आज हे हॉटेल बंद केले आहे. तसेच हॉटेल चालकावर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे. कारवाई केली नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आनंद भरोसे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या: