Gold Smuggling : मुंबईच्या सक्त वसुली संचालनालयाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या सोने तस्करीत विमानतळावरील कर्मचाऱ्याचा हात असल्याचे निदर्शनास आले आहे. सक्त वसुली संचालनालयाने 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करत 10 किलो 923 ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ही 8 कोटी 47 लाख असल्याची माहिती सक्त वसुली संचालनालयाने दिली आहे.
नेमका कसा आला प्रकार उघडकीस?
पहिल्या गुन्ह्यात कॅप्सुल पदधतीने सोन्याची पावडर विमानतळावरील कर्मचार्याद्वारे लपवून नेली जात असताना रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळून 2 किलो 800 ग्रॅम सोन्याची पावडर जप्त केली असून त्याची किंमत 2 कोटी 27 लाख 89 हजार 370 इतकी आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात विमानतळावरील कर्मचार्याच्या संशयास्पद हालचालीवरून त्याची अंगझडती घेतली असता. त्याच्याजवळही 2 किलो 900 ग्रॅम सोन्याची पावडर असलेले कॅप्सुल आढळून आल ज्याची किंमत 2 कोटी 36 लाख 3 हजार 174 इतकी आहे. तिसऱ्या गुन्ह्यात ही विमानतळावरील खासगी कर्मचाऱ्याजवळ 2 कॅप्सुल आढळून आल्या असून यात 610 ग्रॅम सोन्याची पावडर होती ज्याची किंमत 1 कोटी 31 लाख आहे. अंतरवस्त्रात हे सोनो लपवून नेले जात होते. तर चौथ्या गुन्ह्यात विमानतळावरील कर्मचाऱ्याच्या बॅगमध्ये दोन पाऊचमध्ये अशाच पद्धतीने सोन्याच्या पावडर आढळून आली आहे. अंदाजे 3 किलो 120 ग्रॅम ही सोन्याची पावडर असून त्याची किंमत 2 कोटी 53 लाख इतकी आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून अधिक तपास सुरू आहे.
सोने तस्करीच्या घटनांमध्ये वाढ
सोन्याच्या आयात शुल्कातील वाढ आणि भारतात सोन्याच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सोने तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. केवळ सोन्याचे दागिने, बिस्किटे, बारच नव्हे तर सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनही सोन्याची तस्करी होत आहे. विशेष म्हणजे, सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर यावर प्रक्रिया करत त्यातून सोने घडवत त्यांची विक्री भारतामध्ये होत आहे. अशा घटनांवर विविध विभाग लक्ष ठेऊन आहेत. गेल्या काही दिवसात देशात दुबई, आबुधाबी, बँकॉक, मस्कत, सिंगापूर येथून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, दिल्ली या विमानतळावर तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्यामुळे अनेक तस्करांनी परदेशातून भारतीय छोट्या विमानतळांकडे जाणाऱ्या विमानातून सोने तस्करी करण्याचा देखील प्रयत्न अलीकडे सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
सोने तस्करी करणाऱ्या टोळीचे पितळ उघड, 9.6 कोटी रुपयांचे 12 किलो सोने जप्त