IND vs PAK : पार्किंग लॉटमध्ये होणार भारत-पाकिस्तान सामना, विश्वचषकासाठी मैदान सज्ज
IND vs PAK : टी20 विश्वचषकाला अवघ्या दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषकासाठी 20 संघ भिडणार आहेत.
IND vs PAK : टी20 विश्वचषकाला अवघ्या दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषकासाठी 20 संघ भिडणार आहेत. एक जून ते 29 जून यादरम्यान टी20 विश्वचषक रंगणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विश्वचषकतात भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यामध्ये 9 जून रोजी आमना-सामना होणार आहे. न्यूयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. यूएसएमध्ये क्रिकेट प्रसिद्ध नाही, लोकांमध्ये क्रिकेटची आवड वाढावी, त्यामुळे विश्वचषकाचे सामने घेण्यात आलेय. पण न्यूयॉर्कमधील हे स्टेडियम फक्त विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेय. याची आसान क्षमता मुंबईतील वानखडे स्टेडियम इतकी आहे.
पार्किंग लॉटमध्ये तयार केले क्रिकेट स्टेडियम
न्यूयॉर्क शहरामध्ये मोठे मोठे कार्यक्रम होत असतात. न्यूयॉर्क हे शहर मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी ओळखले जाते. भारत-पाकिस्तान विश्वचषक सामना न्यूयॉर्कमध्येच होत आहे. ज्या स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळला जाईल ते आधी न्यूयॉर्क आयलँडर्स या आइस हॉकी संघाचे मैदान होते. नसाऊ कोलिसियममध्ये इतर इनडोअर स्टेडियम आहेत. हे क्रिकेट स्टेडियम आइजनहावर पार्कच्या आत आहे. न्यूयॉर्क आयलँडचे खेळाडू जेथे खेळायचे तिथे प्रेक्षकांची बसण्याची क्षमता 16 हजार इतकी होती. पण क्रिकेटमध्ये जास्त लोक येतात, त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या पार्किंगची जागाही स्टेडियमसाठी घेण्यात आली. इनडोअर स्टेडियम आणि पार्किंगची जागा एकत्र करून क्रिकेट मैदानात रूपांतरित करण्यात आले आहे.
मैदान सज्ज, किती प्रेक्षक मॅच पाहू शकणार?
टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात हाय व्होल्टेज मॅच भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच नासाऊ कंट्री इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे होणार आहे. हाय व्होल्टेज लढतीसाठी मैदान सज्ज झालं आहे. या मैदानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 34 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था या मैदानावर करण्यात आलेली आहे.
टी -20 वर्ल्ड कपमधील भारताचे सामने
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. भारताशिवाय आयरलँड, अमेरिका, पाकिस्तान आणि कॅनडाचा समावेश आहे. भारताची पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार असून दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध होईल. वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढत भारत आणि पाकिस्तान 9 जूनला आमने सामने येणार आहेत.भारताची तिसरी मॅच यूएस विरुद्ध 12 जून आणि चौथी 15 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे.