IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर कर्णधार सूर्याचा पारा चढला! डोळे वटारले अन्.... हँडशेकच्यावेळी नेमकं काय घडलं?, VIDEO
Suryakumar Yadav Angry Kuldeep Yadav : भारताने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये दमदार एन्ट्री मारली.

Suryakumar Yadav Angry Kuldeep Yadav : भारताने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये दमदार एन्ट्री मारली. आधी फलंदाजी आणि मग गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत पाकिस्तानला लोळावलं. मात्र या मोठ्या विजयानंतर मैदानावर घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर कुलदीप यादववर डोळे वटारले अन्....
दुसऱ्या डावातील 18व्या षटकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करत होता. फलंदाज उस्मान तारिकने मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषेजवळ गेला, जिथे कुलदीप यादव (Kuldeep Yadav) उभा होता. झेल तुलनेने सोपा वाटत असताना तो त्याच्या हातातून सुटला. या चुकीनंतर हार्दिक स्पष्टपणे नाराज दिसला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) देखील या प्रसंगावर खुश नव्हता. दोघांनीही काही शब्द कुलदीपला सुनावल्याचे दिसून आले. त्या क्षणापासून वातावरण थोडे ताणले गेलेले जाणवत होते.
Here is the video 📸 pic.twitter.com/TDSUMciCg6
— सुधाकर सिंह राजपूत (@07VSR) February 15, 2026
सामन्यानंतर सूर्याकुमारचा संताप?
61 धावांच्या मोठ्या विजयानंतर खेळाडूंनी हस्तांदोलन केले. मात्र कुलदीप काहीसा नाराज दिसत होता. त्याने सूर्यकुमार यादवला मिठी मारली खरी, पण चेहऱ्यावर निराशा स्पष्ट होती. त्यानंतर तो कर्णधाराकडे दुर्लक्ष करत पुढे निघून गेले. याचवेळी सूर्यकुमार काहीतरी रागाने बोलताना दिसला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता सोशल मीडियावर तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. संघात सर्व काही आलबेल आहे का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
Now, What has Kuldeep yadav Done.
— Shah (@Shahhoon1) February 15, 2026
pic.twitter.com/lVT37l9c33
टीम इंडियाचा मोठा विजय...
टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी केली. कोलंबोमध्ये भारताने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा 61 धावांनी पराभव केला. इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 20 षटकांत 7 बाद 175 धावा केल्या. पाकिस्तानचा संघ 18 षटकांत 114 धावांतच गारद झाला. टी-20 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे.
पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान अमेरिकेच्या खाली घसरला
पराभवानंतर आता पाकिस्तान अ गटातील पॉइंट टेबलमध्ये संघ अमेरिकेच्या खाली घसरला आहे. पाकिस्तान तीन सामन्यांतून दोन विजय आणि एका पराभवासह चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. अमेरिकेची चार सामन्यांतून दोन विजय आणि दोन पराभवांसह चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. सुपर एटमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर पाकिस्तानला नामिबियाविरुद्धचा सामना जिंकावा लागेल.
हे ही वाचा -




















