(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK : वनडेमध्ये पाकिस्तानकडून भारताचा 73 वेळा पराभव, पाहा आकडेवारी
IND vs PAK, World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकातील 12 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे.
IND vs PAK, World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकातील 12 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे. शनिवारी अमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हे दोन संघ आमनेसामने असतील. बाबर आझम आणि विराट कोहली पुन्ह एकदा आमने सामने असतील. त्यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. नुकत्याच झालेल्या आशिया चषकात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला होता. आता पाकिस्तानचा संघ या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरले. पण भारतीय संघाकडूनही प्रतिकार केला जाईल. वनेड विश्वचषकात पाकिस्तानविरोधात भारताचे पारडे जड आहे. पण वनडेच्या इतिहासात पाकिस्तान संघाने बाजी मारली आहे.
कोणत्या संघाचे पारडे जड -
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 134 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने 73 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाने 56 सामन्यात बाजी मारली आहे. म्हणजेच, आतापर्यंतच्या वनडे सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध 73 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. ही आकडेवारी पाहता एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं पारडे जड असल्याचे दिसतेय. 5 सामन्याचा निकाल लागलेला नाही.
विश्वचषकात भारतच भारी -
वनडे इतिहासात पाकिस्तान संघाचे पारडे जड असले तरी विश्वचषकात भारतच वरचढ राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये सातवेळा सामना झाला आहे. या सर्व 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तानला विश्वचषकातील एकही सामना जिंकता आला नाही. 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव करत भारत आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर पाकिस्तान विश्वचषकातील पराभवाचा सिलसिला तोडण्यासाठी मैदानात उतरेल.
ओव्हरऑल वनडे सामन्यात पाकिस्तान संघ भारतापेक्षा जास्त वरचढ दिसत आहे. पण विश्वचषक सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. आता 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
वनडे विश्वचषकात भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान संघ -
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम.