जाडेजाच्या चेंडूवर सलमान जखमी, डोळ्याजवळून वाहू लागले रक्त, राहुलची खिलाडूवृत्ती
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE : भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली.
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE: भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यामुळे सलामान आगा आणि इफ्तिखार अहमद यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. रविंद्र जाडेजा याचा चेंडू स्विप करण्याच्या प्रयत्नात सलमान आगा जखमी झालाय. सलमान आगा याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. जिथे चेंडू लागला तेथून रक्त येण्यास सुरुवात झाली होती. फिजिओ तात्काळ मैदानात दाखल झाले. त्याच्यावर उपचार करण्यात आले.
सलामान आगा याला चेंडू लागल्यानंतर डोळ्याजवळून रक्त येऊ लागले. त्यावेळी केएल राहुल याने खिलाडूवृत्ती दाखवत त्याची विचारपूस केली. सलमान आगा दुखापतीमुळे विवहळत होता. त्याला प्रचंड त्रास होत होता. पण संघाची स्थिती पाहता त्याने खेळण्याचा निर्णय घेतला.
Agha Salman bleeding after the ball hit near his eyes.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 11, 2023
Great from KL Rahul to instantly check on him! pic.twitter.com/SDwbjMTJ92
पाकिस्तानने चार विकेट गमावल्या आहेत. बाबर आझम, इमाम उल हक, फकार जमान यांना मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानने 22 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 85 धावा केल्या आहेत.
भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज इमाम उल हक स्वस्तात बाद झाला. अवघ्या 17 धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर 43 धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. बाबर आझम याला हार्दिक पांड्याने स्वस्तात तंबूत पाठवले. तर इमामचा अडथळा बुमराहने दूर केला. कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनीही प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पाकिस्तान संघ सध्या पराभवाच्या छायेत आहे.
विराट-राहुलची अभेद्य भागिदारी
रोहित शर्माच्या भारतीय संघानं आशिया चषकातल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी ५० षटकांत ३५७ धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. भारताच्या विराट कोहली आणि लोकेश राहुल या आदल्या दिवशीच्या दोन्ही नाबाद फलंदाजांनी शतकं झळकावली. त्यामुळं भारतानं २४ षटकं आणि एका चेंडूतल्या दोन बाद १४७ धावांवरून ५० षटकात दोन बाद ३५६ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीनं वन डे कारकीर्दीतलं सत्तेचाळीसावं, तर लोकेश राहुलनं वन डे कारकीर्दीतलं सहावं शतक झळकावलं. विराटनं वन डे कारकीर्दीतला १३ हजार धावांचा टप्पाही पार केला. त्यानं ९४ चेंडूंत नाबाद १२२ धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलनं १०६ चेंडूंत नाबाद १११ धावांची खेळी केली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २३३ धावांची अभेद्य भागीदारी रचली.