एक्स्प्लोर

रांचीमध्ये रंगणार पहिली टी20 मॅच, टीम इंडियाच्या भेटीला आला 'दि ग्रेट MS Dhoni'; पाहा व्हिडिओ

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका उद्यापासून (27 जानेवारी) खेळवली जाणार आहे. पहिला टी20 सामना रांची्च्या मैदानात रंगणार आहे.

MS Dhoni Meets Team India :  भारतीय क्रिकेट संघ (Team India) एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान उद्या अर्थात 27 जानेवारीपासून टी20 सामने खेळवले जाणार असून पहिला सामना रांची येथे होणार आहे. दरम्यान पहिल्या टी20 सामन्यासाठी संघ रांची येथे पोहोचला असताना एका खास व्यक्तीनं खेळाडूंना भेट दिली आहे. ही व्यक्ती म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni). धोनी हा रांचीचाच असल्यानं टीम इंडिया त्याच्या शहरात येताच त्याने आवर्जून खेळाडूंची भेट घेतली. 

दरम्यान या भेटीचा व्हिडीओ बीसीसीआयनं त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्याला कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की पाहा टीम इंडियाला रांची येथे भेटण्यासाठी कोण आलं आहे महान एम.एस. धोनी. दरम्यान या व्हिडीओवर नेटकरीही बऱ्याच कमेंट्स करताना दिसत आहेत. व्हिडीओत आपण पाहू शकतो ईशान किशन, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या हे खास गप्पा-टप्पा धोनीबरोबर करताना दिसत आहेत. तर सुंदरसह इतरही कोचिंग स्टाफ धोनीसोबत बोलताना दिसत आहे. विशेष म्हणजे धोनीचा फिटनेस अजूनही वाखणण्याजोगा असल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.

पाहा VIDEO -

एकदिवसीय मालिकेनंतर आता लक्ष्य टी20

भारतानं न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना 8 गडी राखून जिंकल्यावर तिसऱ्या सामन्यात 90 धावांनी दमदार विजय मिळवला. विशेष म्हणजे या सर्व सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चमक दाखवली. दरम्यान आता टी-20 मालिकेत भारत हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडू घेऊन उतरणार असून नेमकी कशी कामगिरी करतो हे पाहण्याजोगं असेल...

भारताचा टी20 संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 

भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना  27 जानेवारी 2023 रांची
दुसरा टी-20 सामना 29 जानेवारी 2023 लखनौ
तिसरा टी-20 सामना 01 फेब्रुवारी 2023 अहमदाबाद

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला नाव घ्यावं लागेल; मनोज जरांगे आक्रमकUddhav Thackeray : वायकरांच्या मतदारसंघात ठाकरेंची मशाल! ठाकरे EXCLUSIVEABP Majha Headlines : 01 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMallikarjun Kharge India Alliance PC : खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Embed widget