(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यरची संयमी खेळी; भारताचं न्यूझीलंडसमोर 220 धावांचं लक्ष्य
IND vs NZ 3rd ODI: या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णाधार केन विल्यमसननं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
IND vs NZ 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) संयमी खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडसमोर 220 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णाधार केन विल्यमसननं (Kane Williamson) प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला अॅडम मिल्ने (Adam Milne) आणि डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) त्यानंतर टीम साऊथीनं (Tim Southee) भेदक गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचा डाव अवघ्या 219 धावांवर आटोपला.
कर्णधार केन विल्यमसननं या मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकला. न्यूझीलंडनं तिन्ही सामन्यात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पावसानं भारताचं टेन्शन वाढवलं. दुसरा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. दरम्यान, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
ट्वीट-
3RD ODI. WICKET! 47.3: Washington Sundar 51(64) ct Tom Latham b Tim Southee, India 219 all out https://t.co/NGs0Ho7YOX #NZvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2022
न्यूझीलंडची भेदक गोलंदाजी
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत पूर्णपणे अपयशी ठरले. वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतकी खेळी (51 धावा) आणि श्रेयस अय्यरनं 49 धावांची खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडसमोर सर्वबाद 219 धावा केल्या. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, टीम साऊथीनं दोन विकेट्स घेतल्या. लॉकी फॉर्गुसन आणि मिचेल सँटनर यांच्यात खात्यात एक-एक विकेट्स जमा झाली.
भारताची प्लेईंग इलेव्हन
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (पंत), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉन्वे, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन.
हे देखील वाचा-