IND vs NZ 2022: भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज, कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन?
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात क्राइस्टचर्चच्या (Christchurch) हॅगली ओव्हल (Hagley Oval) मैदानावर बुधवारी (30 नोव्हेंबर 2022) तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.
![IND vs NZ 2022: भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज, कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन? IND vs NZ 3rd ODI: Fantasy Cricket Tips, Today's Playing 11, Player Stats, Pitch Report IND vs NZ 2022: भारत- न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज, कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/344c2e3b7134d6d512911478941a645d1669747232130266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs NZ 3rd ODI Playing 11: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात क्राइस्टचर्चच्या (Christchurch) हॅगली ओव्हल (Hagley Oval) मैदानावर बुधवारी (30 नोव्हेंबर 2022) तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं भारताचा सात विकेट्स राखून पराभव केला. त्यानंतर दुसरा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ 1-0 नं आघाडीवर आहे. मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्यानं भारतीय संघ अखेरच्या सामन्यात मैदानात उतरेल. तर, दुसरीकडं न्यूझीलंडच्या संघाचा अखेरचा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग अमेझॉन प्राईमवर दाखवले जाणार आहे. याशिवाय, चाहत्यांना डीडी फ्री डिशवर भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचा थरार पाहता येणार आहे.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन
भारत:
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह/शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल/कुलदीप यादव.
न्यूझीलंड:
केन विल्यमसन (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डेरी मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, फिन ऍलन, ड्वेन कॉन्वे, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, टिम साउथी.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण | निकाल |
पहिला एकदिवसीय सामना | 25 नोव्हेंबर | ऑकलँड | भारताचा 7 विकेट्सनं पराभव |
दुसरा एकदिवसीय सामना | 27 नोव्हेंबर | हेमिल्टन | पावसामुळं सामना रद्द |
तिसरा एकदिवसीय सामना | 30 नोव्हेंबर | क्राइस्टचर्च | - |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)