Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडचा आणखी एक मोठा विक्रम; एन जगदीशनला टाकलं मागं
MAH vs UP, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशचा 58 धावांनी विजय मिळवलाय.
MAH vs UP, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशचा 58 धावांनी विजय मिळवलाय. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. त्यानं अवघ्या 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली. तसेच एकाच ओव्हरमध्ये सात षटकार ठोकून इतिहास रचला. दरम्यान, ऋतुराज गायकवाडनं तामिळनाडूचा तडाखेबाज एन जगदिशनचा (N Jagadeesan) षटकारांचा विक्रम मोडलाय.
उत्तर प्रदेशविरुद्ध सामन्यात ऋतुराज गायकवाडनं आपल्या खेळीदरम्यान 16 षटकार मारले. या कामगिरीसह त्यानं विजय हजारे ट्रॉफीच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत अव्वल स्थान गाठलंय. यापूर्वी एन जगदीशनच्या नावावर हा विक्रम होता. यंदाच्या हंगामात अरूणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं 15 षटकार मारले होते. त्यानंतर यशस्वी जयस्वालनं या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 12 षटकारांची नोंद आहे. त्यानं 2019 मध्ये झारखंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. विजय हजारे ट्राफीच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विष्णु विनोद चौथ्या क्रमांकावर आहे. विष्णु विनोदनं 2019 मध्ये छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात 11 षटकार लगावले होते. ईशान किशन 11 षटकारासह पाचव्या क्रमांकावर आहे. ईशान किशननं 2021 मध्ये मध्य प्रदेशविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
विजय हजारे ट्रॉफीच्या एका डावात सर्वाधिक षटकार:
क्रमांक | फलंदाज | षटकार |
1 | ऋतुराज गायकवाड | 16 |
2 | एन जगदीशन | 15 |
3 | यशस्वी जयस्वाल | 11 |
4 | विष्णु विनोद | 11 |
5 | ईशान किशन | 11 |
महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशवर 58 धावांनी विजय
या सामन्यात उत्तर प्रदेशच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली.परंतु, कर्णधार ऋतुराजच्या वादळी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राच्या संघानं उत्तर प्रदेशसमोर 331 धावांचं लक्ष्य ठेवलं. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडनं 159 चेंडूत नाबाद 220 धावांनी तुफानी खेळी केली. उत्तर प्रदेशकडून कार्तिक त्यागीनं 3 विकेट्स घेतल्या. तर, राजपूत आणि शिवम शर्मा यांच्या खात्यात एक-एक विकेट्स जमा झाली. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या उत्तर प्रदेशच्या संघाला 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. उत्तर प्रदेशकडून अर्यान जुयालनं एकाकी झुंज देत 159 धावांची खेळी केली. परंतु, त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. महाराष्ट्राकडून राजवर्धननं सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तर,सत्यजीत आणि काझीनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, मनोज इंगळेच्या खात्यात एक विकेट जमा झाली.
हे देखील वाचा-
Ben Stokes: पाकिस्तानमधील पूरग्रस्तांसाठी बेन स्टोक्स मैदानात, कसोटी मालिकेपूर्वी मोठी घोषणा