IND vs NZ, 1st T20 : डॅरेल-कॉन्वेची अर्धशतकं, न्यूझीलंडचं भारतासमोर 177 धावांचं आव्हान
IND vs NZ: रांचीच्या मैदानात सुरु भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी निवडली. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वे आणि डॅरेल मिचेलनं चांगली खेळी केली.
India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पहिला टी20 रांचीच्या जेएससीए मैदानात (JSCA International Stadium, Ranchi) सुरु होत असून भारताने नाणेफेक (Team India) जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर प्रथम फलंदाजी करत किवी संघाने 20 षटकांत 6 गडी गमावत 176 धावा करत भारतासमोर विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाची (Team New Zealand) सुरुवात काहीशी चांगली झाली. फिन अॅलन आणि डेव्हॉन कॉन्वे जोडीने पहिल्या षटकापासून फटकेबाजी सुरु केली. सुरुवातीच्या काही षटकांत वेगवान गोलंदाजांना थोडा चोप मिळाला, पण सुंदरने गोलंदाजीला मैदानात येत दमदार असे दोन विकेट्स घेतले. त्याने सर्वात आधी फिन अॅलन (35) याला सूर्यकुमारच्या हाती झेलबाद करवलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्क चॅपमनला सुंदरने खातंही उघडू दिलं नाही. शून्य धावावर मार्कला बाद करताना सुदंरनेच गोलंदाजी करत एक सुंदर (Washington Sundar)अशी डाईव्ह मारत झेलबाद केलं.
दुसऱ्या बाजूने डेव्हॉन कॉन्वेनं मात्र फटकेबाजी सुरुच ठेवली होती. ग्लेन फिलिप्स 17धावा करुन बाद झाल्यावर डॅरेल मिचलनं कॉन्वेसोबत डाव सावरला. 35 चेंडूत 7 चौकार आणि एक षटकार ठोकत 52 धावा करुन कॉन्वे बाद झाला. सँटनर (7), ब्रेसवेल (1) हे देखील स्वस्तात माघारी परतले. पण मिचेलनं अखेरपर्यंत नाबाद राहत 30 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 59 धावा केल्या. ज्यामुळे न्यूझीलंडनं 176 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. विशेष म्हणजे अखेरच्या षटकार अर्शदीप सिंहला तब्बल 27 धावा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ठोकल्या. ज्यामुळे धावसंख्या अधिक वाढली. आता भारतीय संघ 177 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात येत आहे.
View this post on Instagram
म्हणून निवडली गोलंदाजी
आजचा सामना होणाऱ्या रांचीच्या मैदानात आजवर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 160 च्या मध्यभागी आहे. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या संघांला अधिक फायदा मिळू शकणार असल्याने गोलंदाजीचा निर्णय भारतीय संघानं घेतला आहे.
हे देखील वाचा-