IND Vs IRE, 2nd T20 : आजच्या सामन्यात भारताचे 11 शिलेदार कोणते ? पाहा संभाव्य टीम इंडिया
India vs Ireland 2nd T20 : भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यामध्ये आज दुसरा टी 20 सामना होत आहे.
India vs Ireland 2nd T20 : भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यामध्ये आज दुसरा टी 20 सामना होत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दोन धावांनी विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यादरम्यान पावसाने खोडा घातला होता, त्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. आजच्या सामन्यातही पावसाची अंधूक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघामध्ये बदलाची शक्यता कमीच आहे. विजयी संघ मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आयर्लंडचा संघही कायम राहतो का? हे पाहणं औत्सुयक्याचे ठरणार आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरले. दुसरीकडे आयर्लंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारताचे कोणते शिलेदार मैदानात उतरणार ? याकडे लक्ष लागलेय. पाहूयात त्याबाबत सविस्तर....
युवा खेळाडूंना संधी -
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळाले आहे. या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद, शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा
आयर्लंडची संभाव्य प्लेईंग 11 :
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, लोर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅक्कार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटिल आणि बेंजामिन व्हाइट.
आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक -
भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. तिन्ही सामने डबलिन येथेच होणार आहेत. 18 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. या सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळवला होता. आज डबलिन येथे दुसरा टी20 सामना होणार आहे. 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना डबलिन येथेच होणार आहे.
सिनिअर खेळाडूंना आराम -
18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.