IND vs ENG LIVE Score : लखनौमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात आमना-सामना, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
India vs England LIVE Score, World Cup 2023 : गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला आज होणार आहे.
भारताचा इंग्लंडवर 100 धावांनी विजय
इंग्लंडला नववा धक्का बसलाय. भारत विजयापासून एक पाऊल दूर
इंग्लंडला आठवा धक्का... कुलदीप यादवने लियाम लिव्हिंगस्टोनला तंबूत पाठवले. लिव्हिंगस्टोन याने 27 धावांची खेळी केली. इंग्लंड 8 बाद 98 धावा.
विकेट मिळाल्यानंतर विराट-रोहितचा जल्लोष
इंग्लंडला सातवा धक्का बसलाय. रविंद्र जाडेजाने वोक्सचाला केले बाद..
इंग्लंडला सहावा धक्का... शामीने मोईन अलीला तंबूत पाठवले. मोहम्मद शामीने पाच धावा देत तिसरी विकेट घेतली.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला कुलदीप यादवने क्लिन बोल्ड केले. इंग्लंड पाच बाद 52 धावा
सिराज आणि बुमराहच्या माऱ्यापुढे इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली आहे. 13 षटकांमध्ये 4 विकेट गमावत फक्त 45 धावा फलकावर लावता आल्यात. शामी-बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
बुमराहनंतर शामी ऑन फायर.. इंग्लंडला चौथा धक्का.. रंगात असलेला जॉनी बेअरस्टो 14 धावांवर बाद
बेन स्टोक्स बाद, इंग्लंडला मोठा धक्का... मोहम्मद शामीने काढला क्लिन बोल्ड... इंग्लंड तीन बाद 33 धावा
जसप्रीत बुमराहने इंग्लंडला लागोपाठ दुसरा धक्का दिला. रुटला खातेही उघडता आले नाही. 5 षटकानंतर इंग्लंड दोन बाद 30 धावा
जसप्रीत बुमराहने डेविड मलान याला क्लिन बोल्ड केले. इंग्लंडला पहिला धक्का बसलाय.
जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांनी इंग्लंडसाठी आक्रमक सुरुवात केली आहे.
लखनौच्या इकाना स्टेडियमवर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 9 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माने 87 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय सूर्यकुमार यादव 49 आणि केएल राहुल 39 यांनी मोलाचं योगदान दिले. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी एकही मोठी भागिदारी करता आली नाही. इंग्लंडकडून डेविड विली याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. ख्रिस वोक्स आणि अदील रशीद यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. इंग्लंडला विजयासाठी 230 धावांचे माफक आव्हान आहे.
भारताची 229 धावांपर्यंत मजल.... बुमराहाची 16 धावांची खेळी
सूर्यकुमार यादवच्या रुपाने भारताला आठवा धक्का बसला. सूर्यकुमार यादव 49 धावांवर बाद झालाय. भारत 8 बाद 208 धावा
मोहम्मद शामी एका धावेवर बाद झालाय. वूडने शामीला पाठवले तंबूत
रविंद्र जाडेजाच्या रुपाने भारताला सहावा धक्का बसलाय. जाडेजा 13 चेंडूत 8 धावांवर बाद झाला. भारत सहा बाद 181 धावा... भारतीय संघ अडचणीत.. सूर्यकुमारवर सर्व मदार
लखनौच्या मैदानात इंग्लंडविरोधात टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली. विराट कोहली, गिल आणि अय्यर यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. केएल राहुल याला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी धावसंख्या करता आली नाही. रोहित शर्माने 87 धावांची खेळी केली. आता मैदानात सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जाडेजा खेळत आहे. 40 षटकानंतर भारत पाच बाद 180 धावा.
मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा बाद झालाय. रोहित शर्मा 87 धावांवर बाद झालाय. त्याने 101 चेंडूत 87 धावांचे योगदान दिले.
केएल राहुलच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसलाय. केएल राहुल 39 धावांवर बाद झाला. राहुल याला चांगली सुरुवात मिळाली होती, त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. भारत 4 बाद 131 धावा
रोहित-राहुलची शानदार फलंदाजी सुरु आहे. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली.
रोहित शर्माचे दमदार अर्धशतक... 66 चेंडूमध्ये ठोकले अर्धशतक
रोहित शर्माने 15 व्या षटकात परफेक्ट रिव्ह्यू केल्याने टीम इंडियाचा जीव भांड्यात पडला आहे. भारताने 16 षटकांत 3 बाद 55 अशी मजल मारली आहे.
श्रेयस अय्यरची हाराकिरी सुरुच असून कारण नसताना विकेट फेकली आहे. त्यामुळे भारताला तिसरा झटका बसला आहे.
सलामीवीर शुभमन गिल आणि विराट कोहली शुन्यावर बाद झाल्याने भारताची स्थिती 10 षटकात 2 बाद 35 अशी झाली आहे. रोहित आणि श्रेयस अय्यर खेळत आहेत.
विराट कोहली आणि शुभमन गिल बाद झाल्यामुळे श्रेयस अय्यर याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. रोहित शर्मासोबत डाव संभाळण्याची जबाबदारी अय्यरच्या खांद्यावर असेल.
विराट कोहलीच्या रुपाने भारताला मोठा धक्का बसलाय. 9 चेंडूनंतर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. विश्वचषकात पहिल्यांदाच विराट कोहली शून्यावर बाद झालाय.
शुभमन गिलच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसलाय. वोक्सने गिलला 9 धावांवर तंबूत पाठवलेय. भारत एक बाद 26 धावा
डेविड विलीने रोहित शर्माने पहिले षटक निर्धाव टाकले.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत. डेविड विली गोलंदाजीचा मोर्चा संभाळेल. लखनौच्या मैदानात भारत सहाव्या विजयासाठी तयार
जॉनी बेयरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, मोइन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वूड
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने आणि रोहित शर्मा यांनी सेम प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सांगितले. भारतीय संघात शामी, सिराज आणि बुमराह हे तीन वेगवान गोलंदाज असतील. तर जाडेजा आणि कुलदीप यांच्याकडे फिरकी जबाबदारी असेल.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने इंग्लंडविरोधात मायदेशात 51 वनडे सामने खेलले आहे. भारतीय संघाने 33 सामन्यात विजय मिळवलाय तर इंग्लंडने 17 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. भारतीय संघ मायदेशात इग्लंडपेक्षा वरचढ दिसत आहे. भारताने इंग्लंडविरोधात अखेरचा वनडे सामना पुण्याच्या स्टेडिअमध्ये खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला होता. 2021 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची मालिका झाली होती. यामध्ये भारताने 2-1 विजय मिळवला होता.
थोड्याच वेळात होणार नाणेफेक
ENG vs IND, WC 2023 : लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. इंग्लंड संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे, दुसरीकडे टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर सेमीफायनलचे तिकिट निश्चित होणार आहे. या सामन्यात भारताचा मिडिल ऑर्डर फलंदाज श्रेयस अय्यरकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे. अय्यरला वनडे क्रिकेटमध्ये संयुक्तरित्या वेगवान दोन हजार धावा करण्याची संधी आहे. यासाठी अय्यरला फक्त 69 धावांची गरज आहे.
विश्वचषकात आज भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना होणार आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर दोन्ही संघ भिडणार आहे. या सामन्यात अय्यरने 69 धावांची खेळी केल्यास, तो शिखर धवनच्या विक्रमाची बरोबरी करणार आहे. शिखर धवन याने 48 डावात वनडेमध्ये दोन हजार धावा चोपल्या होत्या.
पार्श्वभूमी
India vs England LIVE Score, World Cup 2023 : गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला आज होणार आहे. विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला पाचपैकी बांगलादेशविरुद्धचा केवळ एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळं भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल.
मायदेशात इंग्लंडविरोधात भारताची कामगिरी England vs India Head-to-Head -
भारताने इंग्लंडविरोधात मायदेशात 51 वनडे सामने खेलले आहे. भारतीय संघाने 33 सामन्यात विजय मिळवलाय तर इंग्लंडने 17 सामन्यात भारताचा पराभव केला आहे. भारतीय संघ मायदेशात इग्लंडपेक्षा वरचढ दिसत आहे. भारताने इंग्लंडविरोधात अखेरचा वनडे सामना पुण्याच्या स्टेडिअमध्ये खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला होता. 2021 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची मालिका झाली होती. यामध्ये भारताने 2-1 विजय मिळवला होता.
वनडेमध्ये कुणाचे पारडे जड - England vs India Head-to-Head in ODI
विश्वचषकात इंग्लंड सरस - England vs India Head-to-Head in ODI World Cup
1975 पासून 2019 पर्यंत वनडे विश्वचषकात भारताविरोधात इंग्लंडचे पारडे जड दिसत आहे. दोन्ही संघ विश्वचषकात आतापर्यंत 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये इंग्लंड संघाने चार सामन्यात विजय मिळवला आहे तर भारताला तीन सामन्यात बाजी मारता आली आहे. एक सामना बरोबरीत राहिलाय.
कधी होणार सामना ? -
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लखनौच्या इकाना स्टेडिअममध्ये रविवारी 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल.
रविवारी लखनौमध्ये पावसाची शक्यता नाही -
हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी लखनौमध्ये तापमान 32 अंशांच्या आसपास असेल. चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पावसाची कोणताही शक्यता नाही. याशिवाय आर्द्रता 40 टक्के राहण्याचा अंदाज आहे. रविवारी लखनऊमध्ये पाऊस पडणार नाही, ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंग्लंड आणि भारताच्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल होणार आहे. भारतीय संघ सध्या 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
खेळपट्टी कशी ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना लखनौच्या इकाना स्टेडियमवर होत आहे. इकाना मैदानाची खेळपट्टी फिरकीला पोषक आहे. पण विश्वचषकातील सामन्यात ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांनाही मदत करत असल्याचे दिसतेय. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना जुन्याच खेळपट्टीवर होत आहे. त्यामुळे फिरकीला मदत मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
गुणतालिकेतील दोन्ही संघाची स्थिती काय ?
जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला अतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाने पाच सामन्यात फक्त दोन गुणांची कमाई केली आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आहे. भारताने आपल्या पहिल्या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने इंग्लंडचा पराभव केल्यास अव्वल स्थानावर पुन्हा झेप घेणार आहे.
हार्दिक पांड्या दोन सामन्याला उपलब्ध नाही -
भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळं त्याला न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही खेळता येणार नाही. हार्दिक पंड्याला दुखापतीच्या कारणास्तव न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. पुण्यातल्या भारत-बांगलादेश सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर चेंडू अडवताना त्याचा पाय मुरगळला होता. त्यामुळं हार्दिक पंड्याला सक्तीच्या विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. हार्दिक सध्या पंड्या पूर्ण विश्रांती घेऊन, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात सामील होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण या सामन्यासाठीही हार्दिक पांड्या उपलब्ध नाही. हार्दिक पांड्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्याविरोधात खेळणार नाही. तो दक्षिण आफ्रिकाविरोधात पाच नोव्हेंबर रोजीच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, असे वृत्त आहे.
भारताची संभाव्य प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविंद्र जाडेजा, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, अश्विन/सिराज, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव
इंग्लंडची संभाव्या प्लेईंग 11 -
जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), हॅरी ब्रूक, मोईन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -