IND vs ENG Test : ध्रुव जुरेलला टीम इंडियाचं तिकिट, इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड
IND vs ENG Test Team : अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरोधात (IND vs ENG test) पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
IND vs ENG Test Team : अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरोधात (IND vs ENG test) पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आलेय. ईशान किशन (Ishan Kishan) याची निवड करण्यात आलेली नाही. तर मोहम्मद शामी (Mohammed Shami) दुखापतीमुळे संघाबाहेर असेल. यशस्वी जायस्वाल याचं संघातील स्थान कायम आहे.
मोहम्मद शामीला संघात स्थान नाही -
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 25 ते 29 जानेवारी रोजी पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे होणार आहे. त्यानंतर 2 ते 6 फेब्रुवारी यादरम्यान विशाखापट्टणम येथे दुसरा सामना होणार आहे. या दोन सामन्यासाठी टीम इंडियात चार वेगवान गोलंदाजांची निवड कऱण्यात आली आहे. मोहम्मद शामी दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्याला मुकणार आहे. मोहम्मद शामी विश्वचषकानंतर टीम इंडियाचा भाग नाही. त्याशिवाय शार्दूल ठाकूर याला वगळण्यात आलेय. शार्दूल ठाकूर याला मागील काही दिवसांपासून प्रभावी कामगिरी करता आली नाही. ईशान किशन यानेही संघातील स्थान गमावलं आहे.
बुमराह-सिराज करणार गोलंदाजीचं नेतृत्व -
इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आलाय. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजाची धुरा संभाळतील. त्यांच्या जोडीला मुकेश कुमार आणि आवेश खान यांना संधी देण्यात आली आहे. फिरकी गोलंदाजीत कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये अक्षर पटेल, आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजा हे त्रिकुट असेल.
ध्रुव जुरेल याला संधी -
ईशान किशन याला संघाबाहेर ठेवण्यात आलेय. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ईशान किशन याने मेंटल हेल्थचं कारण सांगत ब्रेक घेतला होता, पण तो दुबईत पार्ट्या करताना स्पॉट झाला. त्यामुळे बीसीसीआय ईशान किशन याच्यावर नाराज आहे. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी ईशान याला वगळण्यात आलेय. टीम इंडियाने कसोटीत ध्रुव जुरेल याला संधी दिली आहे. तो उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. 23 वर्षीय ध्रुव रेस्ट ऑफ इंडिया आणि अंडर 19 इंडिया अ संघासाठी खेळलाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने 15 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत, त्यामध्ये 790 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेस आहे. त्याशिवाय टी 20 क्रिकेटमध्येही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे.
इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान.
🚨 NEWS 🚨#TeamIndia's squad for the first two Tests against England announced 🔽
— BCCI (@BCCI) January 12, 2024
Rohit Sharma (C ), S Gill, Y Jaiswal, Virat Kohli, S Iyer, KL Rahul (wk), KS Bharat (wk), Dhruv Jurel (wk), R Ashwin, R Jadeja, Axar Patel, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Jasprit…
पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये 25 जानेवारीपासून होणार आहे. दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टणम येथे होणार आहे. राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. रांचीमध्ये 23 फेब्रुवारीपासून चौथा कसोटी सामना होणार आहे. अखेरचा कसोटी सामना धरमशाला मैदानावर सात मार्चपासून होणार आहे.