IND vs ENG : दोन आठवड्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची मालिका, पाहा संपूर्ण माहिती
IND vs ENG : अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरोधात (IND vs ENG test) पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे.
IND vs ENG : अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरोधात (IND vs ENG test) पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. 25 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. गेल्या महिन्यात इंग्लंड संघाने आपल्या संघाची घोषणा केली होती. लवकरच भारतीय संघाची घोषणाही होईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 25 ते 29 जानेवारी रोजी पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे होणार आहे. त्यानंतर 2 ते 6 फेब्रुवारी यादरम्यान विशाखापट्टणम येथे दुसरा सामना होणार आहे. राजकोटमध्ये तिसरा, रांचीमध्ये चौथा तर धरमशाला येथे सात ते 11 मार्च यादरम्यान पाचवा कसोटी सामना होणार आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या ताफ्यात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे.
फिरकीवर विशेष भर-
भारत दौऱ्यासाठी फिरकी विभागावर इंग्लंड संघाने विशेष लक्ष दिलेय. इंग्लंडच्या संघात चार फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. हे चारही गोलंदाज वेगळ्या शैलीचे आहेत. टॉम हार्टली आणि शोएब बशीर या नव्या फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. जॅक लीच याचा बॅकअप म्हणून हार्टले याची निवड करण्यात आली आहे. रेहान अहमद याने संघात कमबॅक केलेय. रेहान डाव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करतो.
वेगवान गोलंदाजांचा भरणा -
इंग्लंडच्या संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये अनुभवी जेम्स अँडरसन, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि एटकिंसन यांचा समावेश आहे. अॅशेस खेळणाऱ्या ख्रिस वोक्स याला डावलण्यात आलेय. कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजी करणार का? याबाबत सपेन्स आहे. गेल्या महिन्यात स्टोक्सची सर्जरी झाली आहे. इंग्लंडच्या संघात जॉनी बेअयरस्टो आणि बेन फॉक्स यांच्या रुपाने दोन विकेटकिपर आहेत.
पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये 25 जानेवारीपासून होणार आहे. दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टणम येथे होणार आहे. राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. रांचीमध्ये 23 फेब्रुवारीपासून चौथा कसोटी सामना होणार आहे. अखेरचा कसोटी सामना धरमशाला मैदानावर सात मार्चपासून होणार आहे.