Jasprit Bumrah: तडाखेबाज फलंदाजी, त्यानंतर भेदक गोलंदाजी अन् आता अफलातून झेल; जसप्रीत बुमराह चमकला!
India tour of England: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध रिशेड्युल कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत दिसत आहे.
India tour of England: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध रिशेड्युल कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत दिसत आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) कर्णधार बेन स्टोक्सला (Ben Stokes) माघारी धाडून इंग्लंडच्या संघाला सहावा धक्का दिलाय. बेन स्टोक्सला पव्हेलियमध्ये पाठवण्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) महत्वाची भूमिका बजावली आहे. लॉग ऑफला फिल्डिंग करताना जसप्रीत बुमराहनं बेन स्टोक्सचा घेतलेला अप्रतिम झेल पाहून प्रेक्षकही अवाक झाले आहेत.
जसप्रीत बुमराहचा अफलातून झेल
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारतानं सातत्य राखत तिसऱ्या दिवशीही इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शार्दुलनं 37व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्टोक्सनं लॉग ऑफच्या दिशेनं शॉट खेळला. त्यावेळी बुमराहनं हवेत उडी मारत अप्रतिम झेल पकडला. याच दिशेला बुमराहनं आधी स्टोक्सचा झेल सोडत त्याला जीवदान दिलं होतं. स्टोक्स 36 चेंडूत 25 धावा करत माघारी परतलाय.
व्हिडिओ-
A pretty special catch. It's been an enthralling morning.
— England Cricket (@englandcricket) July 3, 2022
Scorecard/Videos: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/wBr6gvOD6x
भारताची सामन्यावर मजबूत पकड
बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारताचा संघ 416 धावांत आटोपला. भारताकडून ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजानं शतकी खेळी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजानं भेदक मारा करत इंग्लंडच्या संघाला अचडणीत टाकलंय. तिसऱ्या दिवशीच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडच्या संघानं त्यांच्या पहिल्या डावात सहा विकेट्स गमावून 200 धावा केल्या आहेत. जॉनी बेअरस्टो आणि सॅम बिलिंग्स मैदानात उपस्थित आहे. बेअरस्टो 91 तर, बिलिंग्स 7 धावांवर खेळत आहे.
हे देखील वाचा-