बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडचा संघ हैदराबादमध्ये दाखल, ECB नं पोस्ट केला व्हिडीओ
India vs England 1st Test : भारताविरोधात दोन हात करण्यासाठी इंग्लंडचा संघ हैदराबादमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
India vs England 1st Test : भारताविरोधात दोन हात करण्यासाठी इंग्लंडचा संघ हैदराबादमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमनेसामने असतील. याच थरारासाठी इंग्लंडचा संघ हैदराबादमध्ये दाखल झालाय. इंग्लंड क्रिकेट संघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली.
इंग्लंड क्रिकेट संघाने एक व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. इंग्लंडच्या संघाचा प्रवास या व्हिडीओतून दाखवला आहे. इंग्लंडचे खेळाडू हैदराबादमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं खास अंदाजात स्वागात करण्यात ले. बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडचा संघ सरावाला सुरुवात करणार आहे.
व्हिडीओत इंग्लंडच्या खेळाडूचा एअरपोर्ट ते हॉटेलमध्ये पोहचण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडचा संघ रविवारी रात्री हैदराबादमध्ये दाखल झाला आहे. खेळाडूंचं खास अंदाजात स्वागत करण्यात आले. या व्हिडीओवर चाहत्यांचे लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होतोय. इंग्लंडच्या संघात अनुभवी खेळाडूसह युवा खेळाडूंचा भरणा आहे. जो रुट, बेन स्टोक्स, बेअरस्टो यांच्यासारखे अनुभवी खेळाडू इंग्लंडच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय मार्क वूड आणि जेम्स अँडरसन यांच्यासारखे घातक गोलंदाजही आहेत. त्यांना जॅक लीच याची साथ असेल.
Hello, Hyderabad! 👋
— England Cricket (@englandcricket) January 21, 2024
The City of Pearls ⚪
🇮🇳 #INDvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/hJLQFWkIgp
इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान.
पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
आणखी वाचा :