Ind vs Eng Oval Test Match : गिल अन् गंभीरचं सर्व काही पणाला, पाचवी कसोटी जिंकण्यासाठी घेणार मोठा निर्णय; 4 खेळाडू बाहेर, जाणून प्लेइंग-11
England vs India 5th Test Update : टीम इंडियानं सर्व शक्यता चुकाच्या ठरवत मँचेस्टर टेस्टमध्ये पराभव टाळून सर्वांना आश्चर्यचकित केलं.

England vs India 5th Test Update : टीम इंडियानं सर्व शक्यता चुकाच्या ठरवत मँचेस्टर टेस्टमध्ये पराभव टाळून सर्वांना आश्चर्यचकित केलं. इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत भारतीय संघानं शेवटचे दीड दिवस जबरदस्त फलंदाजी करत केवळ इंग्लंडच्या 311 धावांच्या आघाडीवर मात केली नाही, तर केवळ 4 गडी गमावत स्वतः 114 धावांची आघाडीही घेतली आणि सामना ड्रॉ केला. मात्र, या परफॉर्मन्सनंतरही अखेरच्या कसोटीत टीम इंडियामधून चार खेळाडूंना बाहेर बसावं लागू शकतं.
चौथ्या कसोटीत निवडांवर प्रश्न
या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांप्रमाणेच चौथ्या कसोटीतही टीम इंडियाची निवड चर्चेचा विषय ठरली. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजनं पदार्पण केलं आणि अष्टपैलू शार्दुल ठाकुरचीही पुनरागमन झालं. मात्र तरीही प्रश्न उपस्थित झाले तो म्हणजे, संघानं चार प्रमुख वेगवान गोलंदाजांऐवजी केवळ तीन का खेळवले? किंवा कुलदीप यादवसारख्या इन-फॉर्म फिरकीपटूला संधी का दिली गेली नाही?
पंत बाहेर, बुमराहवर शंका
अखेरच्या कसोटीपूर्वीही हेच प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहेत. लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर 31 जुलैपासून सुरू होणाऱ्या अखेरच्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित मानले जात आहेत. मँचेस्टर टेस्टमध्ये खेळलेल्या चार खेळाडूंना बाहेर बसावं लागू शकतं.
🚨 𝗦𝗾𝘂𝗮𝗱 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲 🚨
— BCCI (@BCCI) July 27, 2025
Rishabh Pant ruled out of fifth Test due to injury; N Jagadeesan named replacement.
All The Details 🔽 #TeamIndia | #ENGvIND
पहिलं नाव आहे ऋषभ पंतचं, जो आधीच मालिकेबाहेर झाला आहे. त्याच्या जागी युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलला संधी मिळणं निश्चित आहे. त्याशिवाय तीन खेळाडू असे आहेत जे कोणतीही दुखापत नसतानाही बाहेर जाऊ शकतात. त्यात सर्वात मोठं नाव म्हणजे जसप्रीत बुमराह. संपूर्ण मालिकेत त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर चर्चा रंगली. आधीच जाहीर करण्यात आलं होतं की तो केवळ तीन कसोटी खेळेल. मात्र, मँचेस्टरमध्ये महत्त्वाचा सामना असल्यामुळे त्याला उतरवण्यात आलं. तो सामना बुमराहसाठी विशेष परिणामकारक ठरला नाही. आता कोच गौतम गंभीर त्याला चौथ्या सामन्यात खेळवतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शार्दुल व अंशुल ठरले फेल
शार्दुल ठाकुरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देणं चर्चेचं कारण बनलं. इंग्लंडच्या डावात टीम इंडियानं 152 षटकं टाकली, पण शार्दुलकडून केवळ 11 षटकं टाकली गेली आणि त्यातही तो निष्प्रभ ठरला. 55 धावा देऊन एकही बळी नाही. त्यामुळे स्पष्ट आहे की कर्णधार शुभमन गिल यांचा त्याच्यावर विश्वास बसलेला नाही.
24 वर्षीय अंशुल कंबोजदेखील पहिल्याच सामन्यात प्रभाव टाकण्यात अपयशी ठरला. त्याच्या गोलंदाजीचा सरासरी वेग फक्त 129 किमी प्रतितास राहिला, ज्यामुळे त्याच्या क्षमतेवर शंका घेतली गेली. काही सूत्रांनुसार, अंशुल पूर्णतः फिट नव्हता, तरीही त्याला खेळवण्यात आलं, यावरही टीम मॅनेजमेंटवर टीका होत आहे.
कुलदीप यादवच्या संधीला बळ
भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी म्हणजे एजबेस्टन कसोटीतील चमकदार कामगिरी करणारा आकाश दीप आता पुन्हा फिट झाला आहे, आणि अर्शदीप सिंगही दुखापतीमधून सावरला आहे. प्रसिद्ध कृष्णा देखील पर्याय म्हणून सज्ज आहे. त्यामुळे अंशुल कंबोजच्या जागी आकाश दीप संघात परतू शकतो, आणि जर बुमराहला विश्रांती देण्यात आली तर प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळू शकते. ओव्हलची खेळपट्टी पाहता कुलदीप यादवचा अखेरचा कसोटी खेळण्याचा संभवही वाढला आहे.
टीम इंडियाची संभाव्य अंतिम-11 : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आकाश दीप, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
हाच संघ अंतिम असण्याची शक्यता आहे, मात्र बुमराह जर उपलब्ध आणि फिट असेल तर प्रसिद्ध कृष्णा किंवा आकाश दीप यांच्यापैकी एकाला बाहेर जावं लागू शकतं.
हे ही वाचा -





















