एक्स्प्लोर
India lost 5th Test : मालिकाविजयापासून भारत थोडक्यात हुकला, हातातील सामना भारताने गमावला, कुठे झाली नेमकी चूक?
IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीमध्ये सात विकेट्सनी भारताने सामना गमावला. एकावेळी सामन्यात चांगल्या स्थितीत असणारा भारताच्या हातातून बघता-बघता सामना निसटला.
India vs England : भारतीय संघाने गमावलेला इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना हा केवळ एक सामना नसून इंग्लंडच्या भूमीत जाऊन मालिकाविजयाची सुवर्णसंधी होती. मालिकेत आधी 2-1 च्या आघाडीवर असणाऱ्या भारताने हा सामना जिंकला असता तर मालिकाही जिंकली असती. पण भारताने सामना गमावल्याने मालिका अनिर्णित सुटली. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यात एक वेळ अशी होती, जेव्हा भारत आघाडीवर होता. सामना भारतच जिंकेल असे वाटत होते, पण तेव्हाच इंग्लंडने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे बघता-बघता सामना भारताच्या हातातून निसटला. तर या पराभवासाठी कारणीभूत काही महत्त्वाची कारणं पाहूया...
- सर्वात आधी म्हणजे नाणेफेक गमावल्यामुळे फलंदाजी आलेल्या भारताची सुरुवातच अत्यंत खराब गेली. अवघ्या 100 धावांच्या आतच सर्व आघाडीचे फलंदाज असा निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर जाडेजा आणि पंतने शतकं ठोकत डाव सावरला, पण इंग्लंडच्या खेळाडूंचा वाढलेला आत्मविश्वास पुढील इनिंगमध्येही भारताला मागे टाकण्यात त्यांना महत्त्वाचा ठरला
- सामन्यात भारतीय संघानं गोलंदाजीत कमाल केली नाहीच पण क्षेत्ररक्षणातही भारत खास कामगिरी करु शकला नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी अगदी सहज धावा केल्या. त्यातच सामनावीर जॉनीने दोन्ही डावात शतक ठोकलं. पण दुसऱ्या डावातील त्याच्या शतकापूर्वी अवघ्या 14 धावांवर असताना हनुमा विहारीने त्याचा झेल सोडला. ज्यानंतर त्याने शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
- क्षेत्ररक्षणात खराब कामगिरी करणाऱ्या भारताच्या पराभवातील सर्वात मुख्य कारण खराब गोलंदाजी ठरलं. दुसऱ्या डावात इंग्लंडने सुरुवात चांगली केली. पण बुमराहने दमदार गोलंदाजी करत इंग्लंडची 109 वर 3 बाद अशी अवस्था केली. त्यानंतरही तब्बल 378 धावांचं टार्गेट इंग्लंडने 7 गडी राखून पूर्ण केलं. यातून भारताने किती खराब गोलंदाजी केली याचा परिचय येतोय.
- तर यानंतरचं आणथी एक कारण म्हणजे सामन्यात भारताचा संकटमोचक ठरलेल्या ऋषभ पंतने केलेल्या दोन चूका. त्याने 31 व्या ओव्हरमध्ये जाडेजाच्या चेंडूवर एक चूकीचा रिव्ह्यू घेतला. त्यावेळी जो रूटच्या पॅडला लागून बॉल मागे गेला होचा. बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. पण त्याचवेळी पंतने गडबडीत रिव्ह्यू घेतला. ज्यामुळे भारताने रिव्ह्यू गमावला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्येही मोहम्मद शमीच्या ओव्हरमध्ये पंतने चूकीचा रिव्ह्यू घेत आणखी एक रिव्ह्यूय गमावला. त्यामुळे 203 धावा ठोकणाऱ्या पंतने या दोन चूकाही सामन्यात केला.
- भारताच्या पराभवात आणखी एक मोठं कारण म्हणजे नवखा कर्णधार. पहिल्यांदाच भारताचं कसोटीत नेतृत्त्व करणाऱ्या बुमराहला अधिक अनुभव नसल्याने तो खास नेतृत्त्व करु शकला नाही. ज्यामुळे गोलंदाजांची निवड, फिल्ड सेट अशा काही महत्त्वाच्या गोष्टीत टीम इंडियाची गल्लत झाली आणि सामना भारताच्या हातातून निसटला.
हे देखील वाचा-
- IND Vs ENG : ऋषभ पंतच्या दोन चूकांमुळे टीम इंडियाला झाला मोठा तोटा, वाचा नेमकी चूक कुठे झाली?
- IND vs ENG : एजबेस्टन कसोटीत भारतीयांवर वंशभेदी टीका करणाऱ्यांवर होणार कारवाई, इंग्लंड क्रिकेटने दिली माहिती
- Rishabh Pant Record : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पंतने केला खास रेकॉर्ड, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement