Ind vs Eng 5th Test Day 4 : आता थांबायचं नाय! ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार, भारत 4 विकेट दूर, तर इंग्लंडला हव्या इतक्या धावा
Ind vs Eng 5th Test Day 4 Latest Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ओव्हल कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारताच्या दृष्टीने अत्यंत चांगला ठरला.
LIVE

Background
India vs England Live Score 5th Test Day 4 Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ओव्हल कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारताच्या दृष्टीने अत्यंत चांगला ठरला. तिसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले असून इंग्लंडने 1 गडी गमावत 50 धावा केल्या आहेत. आता भारताला विजयासाठी केवळ 9 गडी, तर इंग्लंडला विजयासाठी 324 धावांची गरज आहे.
शेवटच्या चेंडूवर सिराजचा झटका!
दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने इंग्लंडचा ओपनर झॅक क्रॉली (14) ला बोल्ड करत मोठं यश मिळवलं. दुसरा ओपनर बेन डकेट 34 धावांवर नाबाद आहे. विशेष म्हणजे इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज क्रिस वोक्स पहिल्या दिवशी जखमी झाला आणि तेव्हापासून मैदानावर दिसलेले नाहीत. त्यांनी पहिल्या डावात फलंदाजीही केली नाही. त्यांच्या दुसऱ्या डावातही खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारताला प्रत्यक्षात फक्त 8 गडी बाद करावे लागतील.
इंग्लंड की टीम इंडिया कोण जिंकणार? पाचव्या दिवशी लागणार निकाल
ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 विकेट गमावून 339 धावा केल्या आहेत. पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. आता सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार आहे. इंग्लंडला जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे, भारताला जिंकण्यासाठी 4 विकेटची आवश्यकता आहे, तर ख्रिस वोक्स फलंदाजी करेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर वोक्स फलंदाजी करू शकला नाही, तर टीम इंडियाने 3 विकेट घेतल्यानंतर लगेचच विजयी घोषित केले जाईल.
खराब प्रकाशामुळे खेळ थांबला, भारताला जिंकण्यासाठी 3 विकेट्स हव्या, तर इंग्लंडला इतक्या धावांची गरज, कोण जिंकणार?
खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आहे. इंग्लंड विजयापासून 35 धावा दूर आहे. यजमान संघाने सहा विकेट गमावत 339 धावा केल्या आहेत. जेमी स्मिथ दोन आणि जेमी ओव्हरटन खाते न उघडता खेळत आहेत. भारताला जिंकण्यासाठी 3 विकेट्स हव्या आहेत, कारण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दुखापतीनंतर वोक्स कसोटी सामन्यात पुढे खेळणार नाही.




















