एक्स्प्लोर

IND vs ENG: मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज, टीम इंडिया चौथ्या दिवशी चौथी कसोटी जिंकणार?

India vs England 4th Test Live cricket score  : इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 नं आघाडीवर असलेली टीम इंडिया रांची कसोटी खिशात घालून कसोटी मालिकेवरही कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

Team India vs England 4th Test : टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (IND vs ENG Test Series) चौथा कसोटी सामना (4th Test Series) सध्या रांची (Ranchi Test) येथे सुरू आहे. रांची कसोटीत टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित आहे. चौथ्या कसोटीत ब्रिटिशांनी भारतीय क्रिकेट संघासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. साहेबांचं लक्ष्य स्विकारून मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या. अशातच आज चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी आणखी फक्त 152 धावा करायच्या आहेत.  

India vs England 4th Test Live cricket score 

  • रवींद्र जाडेजा पाठोपाठ सरफराज खानही बाद, नावाजलेला सरफराजचा फुगा फुटला, पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद, विजयाकडे जाणारी टीम इंडिया पराभवाच्या छायेत
  • रोहितपाठोपाठ रजत पाटीदार माघारी, शोएब बशीरचा भारताला तिसरा धक्का, पाटीदार शून्यावर बाद, 100 धावांवर भारताची तिसरी विकेट, टीम इंडिया बॅकफूटवर 
  • भारताला दुसरा धक्का, कर्णधार रोहित शर्मा बाद, हार्टलीच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या नादात फसला, स्टम्पिंगवर बाद, 55 धावा करुन माघारी, भारताला अजूनही विजयासाठी 93 धावांची गरज 
  • भारताला पहिला झटका, सलामीवीर यशस्वी जयस्वाल माघारी, ज्यो रुटला पहिलं यश, जयस्वालच्या 44 चेंडूत 37 धावा

इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 नं आघाडीवर असलेली टीम इंडिया रांची कसोटी खिशात घालून कसोटी मालिकेवरही कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा 24 धावांवर, तर यशस्वी जैसवाल 16 धावांवर नाबाद माघारी परतला. साहेबांच्या फिरकीपटूंविरोधात दोघेही अगदी सहज धावा काढत होते. या दोन्ही फलंदाजांना शोएब बशीर, टॉम हार्टली आणि जो रूट या त्रिकुटाविरुद्ध धावा करण्यात कोणतीही अडचण आली नाही.

दुसऱ्या डावात केवळ 145 धावांवरच अडखळला इंग्लंड 

पहिल्या डावांत 353 धावा करणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 145 धावांवर गारद झाला. सलामीवीर जॅक क्रॉलीनं दुसऱ्या डावात इंग्लंडकडून सर्वाधिक 60 धावा केल्या. क्रॉलीनं सात चौकार मारले. एकेकाळी इंग्लंडची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 110 धावा होती. क्रॉली आणि बेअरस्टो सहज धावा काढत होते, पण त्यानंतर कुलदीप यादवनं क्रॉलीला बाद करून सामन्याचं चित्र पूर्णपणे फिरवलं. इंग्लंडनं शेवटच्या सात विकेट केवळ 35 धावांत गमावल्या. दुसऱ्या डावात जो रूट 11, बेन स्टोक्स 04, बेन फॉक्स 17 आणि बेन डकेट केवळ 15 धावा करू शकला. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 

भारताचा डाव अश्विननं गाजवला 

भारताच्या दुसऱ्या डावात फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली. इंग्लंडच्या सर्व 10 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. अश्विननं 51 धावा देत पाच फलंदाजांना आपले विकेट्स बळी बनवले. तर कुलदीप यादवनं 22 धावांत चार बळी घेतले. याशिवाय रवींद्र जाडेजाला एक विकेट मिळाली. याआधी पहिल्या डावात ध्रुव जुरेलनं 95 धावांची खेळी करत भारतीय क्रिकेट संघाला संकटातून सोडवले होते. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला पहिल्या डावात 307 धावा करता आल्या.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget